Team My pune city – पिंपरी चिंचवड शहरातील ( Misshap) भोसरी एमआयडीसी पोलिस स्टेशनजवळ आज अचानक एक मोठे झाड रस्त्यावर कोसळण्याचा प्रकार घडला. या घटनेमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. या झाडाखाली एक दुचाकी व एक सायकल अडकून पडली होती. पोलिस कर्मचारी विठ्ठल तरंगे यांनी याबाबत महापालिकेच्या अग्निशमन विभागाला माहिती दिली. त्यास तात्काळ प्रतिसाद देत मुळशी उपअग्निशमन केंद्राचे पथक घटनास्थळी दाखल झाले.
MP Shrirang Barne : खासदार श्रीरंग बारणे यांनी एक्सप्रेस हायवेवर जाऊन वाहिली शहिदांना श्रद्धांजली
रस्त्यावर झाड पडल्यामुळे अडथळा निर्माण होऊन रस्त्याच्या ( Misshap) दोन्ही बाजूंची वाहतूक बंद झाली होती. अशा परिस्थितीत तात्काळ अग्निशमन दलाच्या जवानांनी पडलेले झाड बाजूला करून त्याखाली अडकलेली वाहने सुरक्षितपणे बाहेर काढली आणि रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. ही संपूर्ण कारवाई अत्यंत तत्परतेने पार पाडण्यात आल्याने नागरिकांनी अग्निशमन विभागाच्या कार्यक्षमतेचे आणि तत्परतेचे कौतुक केले आहे.
Metro : भक्ती-शक्ती ते चाकण मार्गाच्या मेट्रोचा डीपीआर तयार करा
दरम्यान, अशा प्रकारच्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये नागरिकांनी १०१ (अग्निशमन विभाग) किंवा १०८ (आपत्कालीन मदत क्रमांक) या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन अग्निशमन विभागामार्फत करण्यात आले आहे.
पिंपरी चिंचवड शहरात आपत्तीजन्य किंवा अपघाती घटना घडल्यास अग्निशमन विभागाकडून तातडीने प्रतिसाद देणे ही आमची जबाबदारी ( Misshap) आहे. आज रस्त्यावर झाड कोसळल्याची माहिती मिळताच तात्काळ प्रतिसाद देऊन रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. आपत्तीकालीन परिस्थितीत मदत करण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली असून, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आम्ही सदैव तत्पर आहोत.
– उमेश ढाकणे, सहाय्यक आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका.