डीपीआर सादरीकरणाबाबत फुगेवाडी येथे महत्वपूर्ण बैठक संपन्न
Team My Pune City – भक्ती शक्ती ते चाकण या मार्गावर मेट्रोचे ( Metro)काम लवकरच सुरू होण्याबाबत हालचालींना वेग आला आहे. महामेट्रोने बनविलेल्या सविस्तर प्रकल्प अहवालाबाबत (डीपीआर) फुगेवाडी मेट्रो कार्यालयात सोमवारी (1 सप्टेंबर) महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. दरम्यान महामेट्रो कडून भक्ती शक्ती ते चाकण मेट्रो मार्गाचा डीपीआर पिंपरी चिंचवड महानगर पालिकेला सोपविण्यात आला आहे. हा मेट्रो मार्ग 42 किलोमीटरचा असून मुकाई चौक, भुजबळ चौक, नाशिक फाटा मार्गे चाकण पर्यंत जाणार आहे.
या बैठकीसाठी विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे, मनपा आयुक्त शेखर सिंह, महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हार्डीकर यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
PCCOE : औद्योगिक जगतात ऑटोमेशन, डेटा संकलन महत्वाचे – रंगा गुंटी
पिंपरी चिंचवड शहराची सध्या सुमारे 30 लाख लोकसंख्या( Metro) आहे. यामध्ये वर्षानुवर्षे मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. फुगेवाडी ते भक्ती शक्ती या मेट्रो मार्गानंतर आता भक्ती शक्ती ते चाकण या मेट्रो मार्गाचा डीपीआर तयार करण्यात आला आहे. हा मेट्रो मार्ग मुकाई चौक, भुजबळ चौक, नाशिक फाटा मार्गे चाकण पर्यंत जाणार आहे. दरम्यान यामध्ये 31 मेट्रो स्टेशन असणार आहेत. भक्ती शक्ती ते मुकाई चौक या 4.70 किलोमीटर तसेच भुजबळ चौक वाकड ते नाशिक फाटा या 6.45 किलोमीटर मार्गावर बीआरटीएस आणि मेट्रो असणार आहे तर मुकाई चौक ते भुजबळ चौक वाकड हे नऊ किलोमीटर अंतर महामार्गालगत असणार आहे.
मेट्रो ने बनवलेल्या प्रकल्प अहवालात सन 2031 मध्ये दररोज तीन लाख 38 हजार 96 प्रवासी संख्या अपेक्षित धरण्यात आली आहे. ही प्रवासी संख्या पुढील दहा वर्षात म्हणजेच सन 2041 साली पाच लाख आठ हजार 974, सन 2051 साली सहा लाख 69 हजार 777 तर सन 2061 साली सात लाख 81 हजार 702 एवढी वाढणार असल्याचे नोंदविण्यात आले आहे. या मेट्रो मार्गामुळे पिंपरी चिंचवड शहराचा 75 टक्के भाग व्यापला जाण्याचा अंदाज व्यक्त केला जात( Metro) आहे.
मेट्रो मार्गासाठी 182 कोटींचा खर्च
भक्ती शक्ती ते चाकण मेट्रो मार्गासाठी 182.36 कोटी रुपये खर्च येणार आहे. त्यातील पिंपरी चिंचवड महानगरपालिका 33 कोटी रुपये, राज्य सरकार 77.08 कोटी रुपये तर खाजगी मार्गातून 72.28 कोटी रुपये निधी उभारला जाणार आहे. त्या व्यतिरिक्त कास्टिंग यार्ड आणि इतर तात्पुरत्या कामासाठी 12 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या मेट्रो मार्गासाठी पिलर, मेट्रो स्टेशन यासाठी एक लाख 69 हजार 225 चौरस मीटर जागा लागणार ( Metro)आहे.
Crime News : पूर्ववैमनस्यातून गाडीवर दगडफेक करून नुकसान
2031 पर्यंत मेट्रो धावणार
महा मेट्रोने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडे एप्रिल 2025 मध्ये डीपीआर सादर केला आहे. महापालिकेकडून या डीपीआरला जून 2025 मध्ये मंजुरी देण्यात आली आहे. त्यानंतर हा डीपीआर राज्य शासनाकडे पाठविण्यात आला आहे. ऑक्टोबर 2025 पर्यंत राज्य शासनाची मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. राज्य शासनाच्या मंजुरीनंतर केंद्राकडे मंजुरीसाठी डीपीआर पाठविण्यात येईल. केंद्र शासनाची एप्रिल 2026 पर्यंत मंजुरी मिळेल. त्यानंतर लगेच मे 2026 मध्ये टेंडरिंग प्रक्रिया सुरू होईल. यानंतर पाच वर्षात मेट्रोचे काम पूर्ण करण्याचे नियोजन महा मेट्रोने केले आहे. एप्रिल 2031 मध्ये भक्ती शक्ती ते चाकण या मेट्रो मार्गाची सुरुवात करण्याचे निश्चित करण्यात आले ( Metro)आहे.
भक्ती शक्ती ते चाकण दरम्यान 31 स्टेशन
भक्ती शक्ती, ट्रान्सपोर्ट नगर, गणेश नगर, मुकाई चौक, रावेत, पुनावळेगाव, पुनावळे, ताथवडे गाव, ताथवडे, भुमकर चौक, भुजबळ चौक, वाकड, विशाल नगर कॉर्नर, कोकणे चौक, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव, नाशिक फाटा, संत तुकाराम नगर, वल्लभनगर, गवळी माथा चौक, भोसरी एमआयडीसी, भोसरी डिस्ट्रिक्ट सेंटर, गोडाऊन चौक, पीआयइसी, भारतमाता चौक मोशी, चिंबळी फाटा, बर्गे वस्ती, कुरुळी, आळंदी फाटा, नाणेकरवाडी, चाकण अशी 31 स्टेशन्स असणार आहेत. भुजबळ चौक ते वाकड या दोन स्टेशन मधील अंतर सर्वात कमी 890 मीटर असणार आहे. तर पीआयइसी ते भारत माता चौक मोशी या दोन स्टेशन मधील अंतर सर्वाधिक 1990 मीटर असणार ( Metro) आहे.