Team My Pune City – नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ( Metro Station ) भाविक व महिला प्रवाशांच्या सोयीसाठी पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपीएमएल) तर्फे नव्या बसमार्गाला सुरुवात करण्यात आली आहे. ‘महात्मा फुले मंडई मेट्रो स्टेशन’ ते ‘तळजाई देवी मंदिर’ या दरम्यान विशेष बससेवा 24 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत प्रवाशांच्या सेवेत राहणार आहे.
National Highway : तळेगाव–चाकण–शिक्रापुर राष्ट्रीय महामार्ग दुरुस्ती व रुंदीकरणासाठी ₹५९.७५ कोटी निधीस मान्यता
महानगरातील नागरिक व भाविकांकडून या बससेवेची मागणी होत होती. त्यानुसार पीएमपीएमएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पंकज देवरे यांच्या निर्देशानुसार बसमार्ग क्रमांक वाय-40 सुरू करण्यात आला आहे.
बसमार्गाचा तपशील – ( Metro Station )
मार्ग क्रमांक: वाय – 40
पासून – पर्यंत: महात्मा फुले मंडई मेट्रो स्टेशन ते तळजाई देवी मंदिर
मार्गे: गाडीखाना → शिवाजीरोड → शाहू चौक → स्वारगेट → एस.टी. कॉलनी → शिवदर्शन → लक्ष्मीनगर → सारंग सोसायटी → सदू शिंदे क्रिकेट स्टेडियम.
National Highway : तळेगाव–चाकण–शिक्रापुर राष्ट्रीय महामार्ग दुरुस्ती व रुंदीकरणासाठी ₹५९.७५ कोटी निधीस मान्यता
फेऱ्यांचा वेळापत्रक – ( Metro Station )
महात्मा फुले मंडई मेट्रो स्टेशनहून:
पहिली बस सकाळी ७.०० वा.
शेवटची बस रात्री १२.०० वा.
तळजाई देवी मंदिरहून:
पहिली बस सकाळी ७.४५ वा.
शेवटची बस रात्री १२.४५ वा.
दररोज या बसमार्गावरून महात्मा फुले मंडई मेट्रो स्टेशनहून ११ व तळजाई देवी मंदिरहून ११ अशा एकूण २२ फेऱ्या होणार आहेत.
नवरात्रोत्सव काळात भाविक भक्तांनी या विशेष बससेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पीएमपीएमएल प्रशासनाकडून करण्यात आले ( Metro Station ) आहे.