वाहतूक कोंडीच्या समस्येवर आता उपाय
Team My pune city – पिंपरी-चिंचवड शहरात दापोडी ते भक्ति-शक्ति या मेट्रो मार्गानंतर भक्ति-शक्ति ते चाकण मेट्रो ( Metro ) मार्गाचा विस्तार होणार आहे. या मार्गाचा डीपीआर तयार करण्याचे काम पूर्ण झाले असून, महामेट्रोने पिंपरी-चिंचवड महापालिकेस तो सूपुर्द केला आहे. नवीन मेट्रो मार्ग निगडीतील भक्ती-शक्ती समुह शिल्प चौकापासून, रावेत, वाकड बायपास, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव, नाशिक फाटा या मार्गे तो चाकण पर्यंत असणार आहे. या नव्या मार्गामुळे पिंपरी-चिंचवड शहराचा ७५ टक्के भाग मेट्रोशी कनेक्ट होणार असून या भागातील वाहतूकीच्या समस्येवर तोडगा निघणार असल्याचे मत मेट्रो अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे.
CP Radhakrishnan : भाजपनं सीपी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतीपदाची उमेदवारी केली जाहीर
शहराची लोकसंख्या तीस लाखांहून अधिक असून हा आकडा ( Metro ) झपाट्याने फुगत आहे. त्यामुळे नवीन मेट्रो मार्गाची गरज असल्याचे विविध संघटना आणि संस्थांकडून सात्याने मागणी केली जात आहे. अखेर, नागरिकांचा मागणी लक्षात घेता निगडी ते चाकण असा नवीन मेट्रो मार्गाचा डीपीआरचा आराखडा तयार करण्यात आला आहे. या मार्गाद्वारे शहराचा दक्षिण भाग तसेच, भोसरीकडील भाग मेट्रोने जोडला जाणार आहे. वाकड आणि पिंपळे सौदागर हा उच्चभ्रू आणि आयटीचा परिसर मेट्रोशी कनेक्ट होणार आहे. डीपीआरला महापालिकेच्या सर्वसाधारण सभेची मान्यता घेऊन तो मंजुरीसाठी राज्य व नंतर केंद्र शासनाकडे पाठविला जाईल. केंद्राने मान्यता दिल्यानंतर या नव्या मेट्रो मार्गाचे प्रत्यक्ष काम सुरू होईल.
निगडीतील भक्ती-शक्ती समुह शिल्प चौक स्टेशन, रावेत, मुकाई चौक, पुणे-मुंबई-बेंगळुरू महामार्ग, वाकड बायपास, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव, नाशिक फाटा, भोसरी, मोशी, चाकण असा हा मार्ग आहे. या मार्गाचे अंदाजे ३५ ते ४० किलोमीटर अंतर आहे. महापालिकेच्या सुचनेवरून महामेट्रोकडून निगडीच्या भक्ती-शक्ती समुह शिल्प चौकापासून रावेत, वाकड, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव, नाशिक फाटा, भोसरी मार्गे चाकणपर्यंत मार्गाचा डीपीआर बनला आहे. या नव्या मार्गामुळे शहराचा एक तृतीयअंश भागातून मेट्रो धावेल. त्या डीपीआरला केंद्राची मान्यता मिळाल्यानंतर प्रत्यक्ष काम सु ( Metro )रू होईल.
Rashi Bhavishya 18 August 2025 : कसा जाईल आपला आजचा दिवस?
या नव्या मेट्रो मार्गामुळे नाशिक फाटा येथे मेट्रोचे एक ( Metro )जंक्शन होणार आहे. या जंक्शनवरून भोसरी, चाकण, शहरातील दापोडी ते निगडी मार्ग तसेच, पुणे शहरात ये-जा करणे सुलभ होणार आहे. तसेच निगडीतील भक्ती-शक्ती समुह शिल्प मेट्रो स्टेशन येथे दुसरे जंक्शन तयार होईल. तेथून रावेत, वाकड, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव, तसेच, भोसरी व चाकण पर्यंत ये-जा करता येणार आहे. शहराची वाढती लोकसंख्या, वाहतूक आणि भविष्यातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी मेट्रोचे जाळे विस्तारण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी भक्ती शक्ती चौक ते चाकण पर्यंत मेट्रो विस्ताराची आवश्यकता आहे. हा मार्ग औद्योगिक, शैक्षणिक आणि निवासी दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे. या मार्गावर मेट्रोचा विस्तार परिसराच्या सर्वांगीण विकासात उपयुक्त ( Metro ) ठरेल.
भक्ति-शक्ति ते चाकण मार्गाचा डिपीआर बनला आहे. महापालिकेकडे तो सूपुर्द करण्यात आला आहे. राज्य आणि त्यानंतर केंद्र शासनाकडून मान्यता मिळाल्यावर काम सुरू होइल. किमान एक ते दिड वर्षाचा कालावधी लागू शकतो.
- डॉ. हेमंत सोनावणे, कार्यकारी संचालक, महामेट्रो