Team My Pune City –पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात मेट्रोची केबल चोरी ( Metro Cable Theft ) करणाऱ्या आंतरराज्य टोळीच्या प्रमुखाला पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट एकने उत्तर प्रदेश येथून अटक केली आहे. त्याने दापोडी आणि कोथरूड येथे मेट्रोची केबल चोरी केल्याची कबुली दिली आहे.
Pune Rain : पुण्यात नद्यांचे नैसर्गिक प्रवाह रोखल्यामुळे सोसायटी आणि रस्त्यांवर पाणी साचले
दिलशाद शामशाद अन्सारी (34, खेकडा, बागपत, उत्तर प्रदेश) असे अटक ( Metro Cable Theft ) केलेल्या आरोपीचे नाव आहे.पोलीस उप आयुक्त डॉ शिवाजी पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, दापोडी मेट्रो स्टेशन जवळ केबल वायर चोरीला गेल्या बाबत दापोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारावर तपास केला असता एक व्यक्ती रात्रीच्या वेळी मेट्रो रेल्वे लाईनवर जाऊन तिथून तांब्याची वायर चोरी करत असल्याचे आढळले.
Kundamala News : कुंडमाता मंदिराला पुराचा धोका; इंद्रायणी नदीच्या पाणी पातळीत वाढ
पोलिसांनी संशयित व्यक्तीचा पाठलाग केला असता तो उत्तर प्रदेश मधील ( Metro Cable Theft ) बागपत येथे असल्याचे पोलिसांना आढळले. त्यानुसार पोलिसांनी त्याला उत्तर प्रदेशमधून अटक केली. त्याच्याकडून दापोडी मेट्रो स्टेशन येथून चोरी केलेली दोन लाख रुपये किमतीची तीनशे मीटर तांब्याची वायर जप्त केली आहे. त्याने यापूर्वी कोथरूड मेट्रो स्टेशन येथून देखील तांब्याची वायर चोरी केली असल्याचे सांगितले.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनायक कुमार चौबे, सह पोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, पोलीस उपायुक्त डॉ शिवाजी पवार, सहाय्यक पोलीस आयुक्त विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद पाटील, पोलीस कॉन्स्टेबल बाबासाहेब गर्जे, गणेश महाडिक, सोमनाथ बोऱ्हाडे, महादेव जावळे, श्रीधर इचके, स्वप्निल महाले, अजित रुपनवर, तुषार वराडे, अमोल वेताळ यांनी ( Metro Cable Theft ) केली.