Team My Pune City – मध्य रेल्वेने रविवार (28 सप्टेंबर) रोजी विद्यानगर ( Megablock) (Vidyavihar) ते ठाणे (Thane) या दरम्यान मुख्य मार्गावर सकाळी 8 ते दुपारी 1.30 वाजेपर्यंत मेगाब्लॉक जाहीर केला आहे. या कामामुळे पुणे-मुंबईदरम्यान धावणाऱ्या अनेक गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे.
रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, या कालावधीत अभियांत्रिकी व देखभाल दुरुस्तीची कामे करण्यात येणार असून, प्रवाशांच्या सुरक्षित प्रवासासाठी हा ब्लॉक आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
Sayali Botre : महिला जिल्हाध्यक्षपदी सायली बोत्रे यांची निवड
प्रभावित पुणे–मुंबई (सीएसएमटी गाठणाऱ्या) गाड्या( Megablock)
ब्लॉकच्या काळात पुढील गाड्या ठाणे येथे अप फास्ट लाईनवर वळवून सोडण्यात येणार असून, या गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने आपल्या गंतव्य स्थानकावर पोहोचतील:
११०१० पुणे–सीएसएमटी सिंहगड एक्स्प्रेस
१२१२४ पुणे–सीएसएमटी डेक्कन क्वीन
१२१२६ पुणे–सीएसएमटी प्रगती एक्स्प्रेस
अन्य सेवा ( Megablock)
याशिवाय, २२२२६ सोलापूर–सीएसएमटी वंदे भारत एक्स्प्रेस हिचाही प्रवास ब्लॉकदरम्यान प्रभावित होणार असून, ती देखील साधारण १० ते १५ मिनिटे उशिराने धावेल.
रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना ब्लॉकदरम्यान प्रवासाचे नियोजन करताना वेळेत बदल लक्षात घेण्याचे आवाहन केले आहे.