situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Medical Admission : वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या तिसऱ्या फेरीत २,६५० नव्या जागांचा समावेश; महाराष्ट्राला १५० जागा

Published On:
Medical Admission

Team My Pune City – वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या तिसऱ्या फेरीचे वेळापत्रक ( Medical Admission ) पुढे ढकलल्याने विद्यार्थी चिंतेत असतानाच राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने देशभरात तब्बल २,६५० नव्या जागांना मान्यता दिली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील १५० जागांचा समावेश असून, या सर्व जागांचा तिसऱ्या फेरीत समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवेशाच्या अधिक संधी उपलब्ध होणार आहेत.

Rashi Bhavishya 15 Oct 2025 – कसा जाईल आपला आजचा दिवस?


रुग्णसंख्येच्या तुलनेत डॉक्टरांची संख्या अपुरी असल्याने केंद्र सरकारने ( Medical Admission ) देशभरात नवीन वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्यासोबतच जागा वाढविण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग दरवर्षी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये नव्या जागांना मान्यता देत आहे.
नव्याने वाढलेल्या जागांमुळे देशातील वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या जागांची एकूण संख्या १,२६,७२५ इतकी झाली आहे. हरियाणा, राजस्थान आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये प्रत्येकी ३०० जागा वाढल्या आहेत. आंध्र प्रदेश आणि उत्तर प्रदेशमध्ये प्रत्येकी २५० जागा, तर महाराष्ट्रात १५० जागांना मान्यता मिळाली आहे. यामध्ये नागपूरमधील दत्ता मेघे वैद्यकीय महाविद्यालयात १०० आणि सोलापूरमधील अश्विनी ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात ५० जागांचा समावेश आहे.

Python Rescue Operation : शेतकरी आणि वन्यजीव रक्षकांच्या तत्परतेने १३ फूट अजगराचे यशस्वी रेस्क्यू ऑपरेशन


राज्यनिहाय जागावाढ ( Medical Admission )

  • आंध्र प्रदेश – २५०
  • छत्तीसगड – १००
  • गुजरात – २५
  • हरियाणा – ३००
  • हिमाचल प्रदेश – ५०
  • कर्नाटक – ३५०
  • मध्य प्रदेश – ५९
  • महाराष्ट्र – १५०
  • ओडिशा – १००
  • राजस्थान – ३००
  • तामिळनाडू – ३००
  • तेलंगणा – १५०
  • उत्तर प्रदेश – २५०
  • उत्तराखंड – १००
  • पश्चिम बंगाल – १७५
  • एम्स रुग्णालये (गुजरात व हिमाचल) – प्रत्येकी ५०, एकूण १००

सहा नवीन वैद्यकीय महाविद्यालयांना मान्यता


राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने जागावाढीसोबतच सहा नवीन वैद्यकीय महाविद्यालयांना मान्यता दिली आहे. यामध्ये राजस्थानमधील दोन, तर तामिळनाडू, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश आणि मध्य प्रदेशमधील प्रत्येकी एका महाविद्यालयाचा समावेश ( Medical Admission ) आहे.

Follow Us On