Team My Pune City – नवरात्रोत्सवानिमित्त (Medha Kulkarni) पुण्यातील विविध ठिकाणी गरब्याचे कार्यक्रम रंगत असताना, कोथरूड भागातील जीत मैदानावर आवाजाच्या नियमांचे उल्लंघन झाल्याने खासदार मेधा कुलकर्णी यांनी थेट हस्तक्षेप करून गरब्याचा कार्यक्रम बंद पाडला.
Accident : कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात कार कोसळून अपघात; एकजण ठार तर एकजण जखमी
मेधा कुलकर्णी यांनी सांगितले की, “दरवर्षी या मैदानावर होणाऱ्या कार्यक्रमांमुळे या परिसरातील नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. परिसरात (Medha Kulkarni) गंभीर आजारांनी ग्रस्त रुग्ण आहेत, ९० वर्षांची महिला आहे, लहान मुले आहेत. अशा परिस्थितीत आवाजाची मर्यादा पाळली गेली नाही तर हा त्रास असह्य ठरतो.”
Maval Vichar Manch : वैचारिक दारिद्रय कधीही दाखवू नये-चंद्रकांत निंबाळकर
त्यांनी पुढे स्पष्ट केले की, “आवाजाची आणि धार्मिकतेची बंधने ओलांडली गेली आहेत. त्यामुळे या मैदानावर पुढे असे कार्यक्रम होऊ देणार नाही. (Medha Kulkarni) नागरिकांच्या तक्रारींनंतर आम्ही पोलिसांनाही वारंवार कळवले, मात्र कारवाई झाली नाही. त्यामुळेच आम्हाला प्रत्यक्ष हस्तक्षेप करावा लागला.”
कुलकर्णींच्या या कारवाईनंतर आयोजकांमध्ये खळबळ उडाली असून, पुढील काळात अशा कार्यक्रमांसाठी आवाज मर्यादा आणि नियमांचे काटेकोर पालन करण्याची (Medha Kulkarni) गरज अधोरेखित झाली आहे.