Team My Pune City – भाजपच्या राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी (Medha Kulkarni)यांना प्रकृती अस्वस्थ झाल्याने पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून, प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती त्यांच्या जवळच्या सूत्रांकडून मिळाली आहे.
Savitribai Phule Pune University : विद्यापीठात १११ प्राध्यापक पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू
स्वतः खासदार कुलकर्णी यांनी सोशल मीडियावरून आपल्या समर्थकांना संदेश देत सांगितले की, “प्रकृती अस्वास्थ्यामुळे मी उपचारार्थ रुग्णालयात दाखल झाले आहे. त्यामुळे काही दिवस आपल्या थेट संपर्कात राहू शकणार नाही. मात्र, काही काम असल्यास माझ्या कार्यालयाशी संपर्क साधावा. प्रकृतीत सुधारणा झाल्यावर लवकरच (Medha Kulkarni)भेटू.”
त्यांच्या या संदेशानंतर कार्यकर्ते आणि समर्थकांनी त्यांच्या लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर (Medha Kulkarni) उपचार सुरू असून, प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे सांगण्यात येत आहे.






















