Team My Pune City – गणेशोत्सवानिमित्त ‘माय पुणे सिटी न्यूज’, ‘मावळ ऑनलाइन न्यूज’ व ‘पीसीएमसी न्यूज’च्या वतीने घेण्यात ( Maza Bappa Gharoghari) आलेल्या ‘माझा बाप्पा घरोघरी’ स्पर्धेचा पहिल्या टप्प्यातील पारितोषिक वितरण समारंभ रविवारी (ता. २१) भोसरी येथील दिपचंद मिल्सच्या दालनामध्ये झाला. स्पर्धेचे सहप्रायोजक असलेले दिपचंद मिल्स यांच्याकडून नारायण पेठ साडी बक्षीस देण्यात आली.
बक्षीस समारंभाला दिपचंद मिल्सचे सहसंचालक भरतसिंग राजपुरोहित, व्यवस्थापक अंकीत राजपुरोहित, ललीत माळी व नारायण माळी यांची प्रमुख उपस्थिती होती. आपले पारितोषिक स्विकारण्यासाठी स्पर्धक कुटुंबियांसहित उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली. यावेळी राजपुरोहित यांनी मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, ”माझा बाप्पा घरोघरी स्पर्धा कलागुणांना वाव देणारी होती. या स्पर्धेमुळे घरोघरी सर्वांनी मिळून कला जोपासली. आम्हालाही सहप्रायोजक म्हणून स्पर्धेत सहभागी होता आले याचा आनंद आहे. यापुढेही आम्ही माय पुणे सीटी, मावळ ऑनलाइन व पीसीएमसी न्यूजच्या विविध उपक्रमांमध्ये सहभागी होऊ. ” विजेत्यांनीही स्पर्धेत सहभागी होऊन मोठा आनंद मिळाल्याची भावना व्यक्त केली.( Maza Bappa Gharoghari) दिपचंद मिल्सचे संचालक रीतेश मित्तल यांनीही स्पर्धकांचे अभिनंदन केले. पीसीएमसी न्यूजचे बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर अनुप घुंगुर्डे यांनी सूत्रसंचालन केले.
SahityaSeva Kala Manch : संगीत आणि नाट्याची एक समृद्ध संध्याकाळ
विजेत्यांची नावे अशी –( Maza Bappa Gharoghari)
निलेश जयंत मोहेकर (चऱ्होली), नयना सुदेश जाधव (भोसरी), राजेश्वरी लांडगे (भोसरी), अनिता डफळ (चिंबळी फाटा), सुनीता गायकवाड (मोशी), राणी हजनाळे (चऱ्होली), मनीषा कुंभारे (चऱ्होली), संगीता डुंबरे (भोसरी), अभय फटांगरे (निगडी), प्रतिभा घुंगुर्डे (चऱ्होली), श्वेता साळुंके (चिखली), श्वेता वालावलकर (चऱ्होली), अक्षय नितीन वाईकर (चऱ्होली), एस. एस. अष्टेकर (भोसरी), कविता पाटील (चाकण), पूनम बाबर (कासारवाडी), कावेरी भारत बाम९णे (चिखली), राहुल शिंदे (चिंबळी फाटा), यशश्री रुपेश राहणे (चोवीसावाडी), लीना श्रीकांत शेटे (मोशी). ( Maza Bappa Gharoghari)

राधा-कृष्णाचा देखावा
नारायण पेठ साडी विजेत्यांपैकी कावेरी बामणे व तन्वी बामणे या भगिनींनी आपल्या घराच्या अख्ख्या हॉलमध्ये राधा-कृष्णाचा देखावा साकारला होता. या भगिनींनीचे आई-बाबा मथुरा येथे राधा-कृष्णाचे दर्शन घेऊन आले. आपल्याप्रमाणेच आपले नातेवाईक व परिचितांना आपल्या घरातूनच मथुरेतील राधा-कृष्णाचे दर्शन व्हावे या भावनेने बामणे कुटुंबाने आपल्या घरातच मथुरेतील राधा-कृष्णाचा अतिशय सुंदर देखावा तयार केला होता.