Team My Pune City – पिंपरी – गणेशोत्सवानिमित्त माय पुणे सिटी न्यूजच्या वतीने घेण्यात ( Maza Bappa Gharoghari Contest Winner)आलेल्या ‘माझा बाप्पा घरोघरी’ स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आहे. या स्पर्धेचे सहप्रायोजक असलेल्या दिपचंद मिल्सकडून समारंभपूर्वक २१ विजेत्यांना नारायण पेठ साडी भेट देण्यात येईल. हा बक्षीस समारंभ रविवारी (ता. २१) सकाळी साडेदहा वाजता दिपचंद मिल्सच्या भोसरी (आळंदी रस्ता) येथील दालनामध्ये होईल. नारायण पेठ साडी जिंकलेल्या विजेत्यांनी आपले पारितोषिक स्विकारण्यासाठी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहनमाय पुणे सिटी न्यूजने केले आहे. अधिक माहितीसाठी अनुप घुंगुर्डे (पीसीएमसी न्यूजचे, बीझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर) यांच्याशी ९८२२८८६५०९ या क्रमांकावर संपर्क साधावा.
Bhosari: भोसरीत सात जणांनी तरुणाला मारहाण; दोन आरोपी अटकेत
दिपचंद मिल्सच्या दालनाचा पत्ता – https://maps.app.goo.gl/EsWv25EYkQcYyGe47?g_st=aw
नारायण पेठ साडी विजेत्यांची नावे पुढीलप्रमाणे – निलेश जयंत मोहेकर( Maza Bappa Gharoghari Contest Winner) (चऱ्होली), नयना सुदेश जाधव (भोसरी), राजेश्वरी लांडगे (भोसरी), अनिता डफळ (चिंबळी फाटा), सुनीता गायकवाड (मोशी), राणी हजनाळे (चऱ्होली), मनीषा कुंभारे (चऱ्होली), संगीता डुंबरे (भोसरी), अभय फटांगरे (निगडी), प्रतिभा घुंगुर्डे (चऱ्होली), श्वेता साळुंके (चिखली), श्वेता वालावलकर (चऱ्होली), अक्षय नितीन वाईकर (चऱ्होली), एस. एस. अष्टेकर (भोसरी), कविता पाटील (चाकण), पूनम बाबर (कासारवाडी), कावेरी भारत बामणे (चिखली), राहुल शिंदे (चिंबळी फाटा), यशश्री रुपेश राहणे (चोवीसावाडी), लीना श्रीनाथ शेटे (मोशी) नयन मोहाडे(चऱ्होली )
सर्व स्पर्धकांसाठी खास ‘बर्थडे गिफ्ट’
स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांना एक हजार रुपयांचे गिफ्ट कूपन ई-मेल द्वारे पाठवण्यात येईल. या कूपनचा उपयोग पीसीएमसी डॉट न्यूज, माय पुणे सिटी डॉट इन व मावळ ऑनलाइन या तीन न्यूज पोर्टलवर आपली किंवा आपल्या कुटुंबातील कोणाही एकाच्या वाढदिवसाची जाहिरात देण्यासाठी करता येईल. एका स्पर्धकाला वर्षभरात एकदाच हे कूपन वापरता येईल. 1000 पिक्सेल रुंद व 1000 पिक्सेल उंच अशा आकारातील आर्टवर्क बनवून देण्याची जबाबदारी स्पर्धकाची राहील. हे आर्टवर्क वाढदिवसापूर्वी दोन दिवस मिळणे आवश्यक ( Maza Bappa Gharoghari Contest Winner) आहे.