मावळ ऑनलाईन – मावळ तालुक्यातील शिक्षक (Maval)व शिक्षण क्षेत्रासाठी आनंदाची बातमी आहे. पुणे जिल्हा परिषदेने राष्ट्रीय शिक्षक दिनानिमित्त जाहीर केलेल्या गुणवंत शिक्षक पुरस्कारांमध्ये मावळ तालुक्यातील एक केंद्रप्रमुख आणि दोन शिक्षकांचा समावेश झाला आहे. या निवडीमुळे स्थानिक स्तरावर उत्साहाचे वातावरण आहे.
कान्हे केंद्राच्या प्रमुख निर्मला काळे यांना गुणवंत केंद्रप्रमुखाचा प्रथम पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांच्या कार्यकौशल्य, शैक्षणिक उपक्रमांचे प्रभावी नियोजन आणि केंद्रातील शाळांना दिलेल्या दिशा याची दखल घेऊन त्यांचा गौरव करण्यात आला आहे.
धामणे शाळेतील शिक्षक पोपटराव रामचंद्र चौगुले यांना प्रथम क्रमांकाचा गुणवंत शिक्षक पुरस्कार घोषित झाला. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांचे केलेले योगदान, नवनवीन अध्यापन पद्धती आणि शाळेतील शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी घेतलेले प्रयत्न या कारणास्तव त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.
Pune traffic update : ईद-ए-मिलाद मिरवणुकीनिमित्त पुण्यात आज वाहतुकीत बदल
Bhagwan Shinde: विद्यार्थ्यांनी जुनी व नवीन अध्ययन पद्धती आत्मसात करून अभ्यास करावा- रो.भगवान शिंदे
तसेच, कान्हे शाळेतील शिक्षिका अक्षता आंबुळे यांना उत्तेजनार्थ पुरस्कार जाहीर झाला आहे. विद्यार्थ्यांशी जिव्हाळ्याचे नाते ठेवत त्यांच्यात आत्मविश्वास जागवणे आणि शाळेतील विविध शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रमांत त्यांचा सहभाग लक्षणीय ठरला आहे.
या पुरस्काराबाबत माहिती गट शिक्षणाधिकारी सुदाम वाळुंज यांनी दिली. त्यांनी सांगितले की, “मावळ तालुक्यातील शिक्षक व केंद्रप्रमुख यांनी केलेले काम हे खर्या अर्थाने प्रेरणादायी आहे. गुणवंत शिक्षक पुरस्कार हा त्यांच्या मेहनतीला मिळालेला सन्मान असून यामुळे इतर शिक्षकांनाही उत्तम कार्य करण्याची प्रेरणा मिळेल.”
स्थानिक ग्रामस्थ, पालक व शैक्षणिक वर्तुळाकडून या तिन्ही गुणवंतांना अभिनंदनाचा वर्षाव होत असून त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.