Team MyPuneCity – पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या कार्याध्यक्षपदी वरसुबाई माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेश मारुती गायकवाड यांची बिनविरोध निवड करण्यात (Maval) आली.
जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या कार्यालयात झालेल्या सर्वसाधारण सभेत ही निवड करण्यात आली. विश्वस्त अरुण थोरात,शिवाजी किलकिले, हनुमंत कुबडे,संघाचे मावळते अध्यक्ष नंदकुमार सागर, सचिव प्रसाद गायकवाड, आदिनाथ थोरात, हरिश्चंद्र गायकवाड आदीं पदाधिकारी (Maval)उपस्थित होते.
गायकवाड हे गेली ३० वर्ष मुख्याध्यापक पदी कार्यरत असून संघटनेत अनेक पदावर ते कार्य करत आहेत.मावळ तालुका मुख्याध्यापक संघाचे सात वर्ष तालुकाध्यक्षपद भूषवले आहे. तसेच जिल्हा मुख्याध्यापक संघाचे तीन वर्षे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी उत्तम पद्धतीने काम पाहिले आहे.
शाळांना भौतिक सुविधासाठी मदत करणे, शाळांच्या अडचणी सोडवण्यासाठी पुढाकार घेणे, मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रशासन स्तरावर मदत करणे. अशी अनेक कामे त्यांनी केलेली आहेत. त्यांच्या या सर्व कामाची दखल घेत जिल्हा संघावर कार्याध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आलेली आहे. गायकवाड यांना यापूर्वी राज्यस्तरीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार सन्मानित करण्यात आलेले (Maval)आहे.
गायकवाड यांच्या निवडीबद्दल मावळ तालुका मुख्याध्यापक संघाचे विश्वस्त बी एम भसे, बाळासाहेब उभे, एन डी पवार, तालुकाध्यक्ष विठ्ठल माळशिकारे, सचिव विकास तारे,कार्याध्यक्ष रमेश अरगडे, नामदेव गाभणे, रमेश फरताडे, संस्थेचे सचिव पोपट बाफना व मावळ तालुका मुख्याध्यापक संघ कार्यकारणी आणि सर्व शिक्षक व मुख्याध्यापक यांनी अभिनंदन (Maval) केले.