Team MyPuneCity – आंब्याच्या झाडांची राखण करण्यासाठी आलेल्या कुटुंबातील ९ वर्षीय मुलगा मावळ तालुक्यातील पाचाणे येथील (Maval Mishap) खाणीत साठलेल्या पाण्यात बुडून मृत्युमुखी पडल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
मृत मुलाचे नाव सूरज सुनील भोसले (वय ९, रा. राजीव गांधी नगर, देहूरोड) असे आहे.
MP Shrirang Barne : खासदार बारणे यांना ‘संसदीय लोकशाहीत प्रभावी सातत्यपूर्ण योगदान’ पुरस्कार जाहीर
देहूरोड येथील भोसले कुटुंब काही दिवसांपूर्वी पाचाणे गावात आंब्याच्या झाडांची राखण करण्यासाठी आले होते. मंगळवारी सूरज हा खेळता-खेळता परिसरातील जुन्या खाणीकडे गेला असता, पाण्याचा अंदाज न आल्यामुळे तो खोल पाण्यात पडला. सुरुवातीला शोध घेतला असता तो सापडला नाही.
Ratnagiri Accident: खेडमध्ये जगबुडी नदीच्या पुलावर कार 100 फूट खाली कोसळली, 5 जणांचा मृत्यू
घटनेची माहिती मिळताच वन्यजीव रक्षक मावळच्या रेस्क्यू टीमने घटनास्थळी धाव घेतली. रात्रभर चाललेल्या शोधमोहीमेनंतर उशिरा सूरजचा मृतदेह (Maval Mishap) खाणीतून बाहेर काढण्यात आला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
याप्रकरणी परंदवडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.