Team MyPuneCity –मावळ तालुक्यातील शिवली गावात ओढ्यात मासे आणि खेकडे पकडण्यासाठी गेलेल्या चौघांना तिघांनी मारहाण केली. ही घटना ५ जून रोजी रात्री घडली.
अंजना बाबू पवार (४५, चावसर, मावळ) यांनी याप्रकरणी वडगाव मावळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दगडू वाघमारे, अंकुश दगडू वाघमारे आणि लहू दगडू वाघमारे (शिवली, मावळ) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Lonavala: भुशी धरणात बुडून दोन तरुणांचा मृत्यू
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांची मुलगी, जावई आणि मुलगा हे शिवली येथील ओढ्यात मासे आणि खेकडे पकडण्यासाठी गेले होते. त्यावेळी तिथे आलेल्या आरोपींनी त्यांना मासे आणि खेकडे का पकडता म्हणून काठीने मारहाण करून दुखापत केली आहे. वडगाव मावळ पोलीस तपास करीत आहेत.