Team MyPuneCity – मावळ तालुक्यातील सुदवडी गावात नदीच्या काठावर सुरू असलेल्या दारूभट्टीवर पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट पाचने कारवाई केली. यामध्ये 4000 लिटर गुळमिश्रित रसायन नष्ट करण्यात आली आहे. ही कारवाई रविवारी (18 मे) सकाळी करण्यात आली.
याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल शामसुंदर गुट्टे यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार येलवाडी येथील 52 वर्षीय महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Disaster Management Camp : मुळशीमध्ये सलग ३६ तासांचे आपत्ती व्यवस्थापन शिबिर यशस्वीपणे पार
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुदवडी गावात सुधा नदीच्या काठावर एका महिलेने दारूभट्टी लावल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी रविवारी सकाळी दारू भट्टीवर छापा मारला. पोलिसांची चाहूल लागतात आरोपी महिला पळून गेली. या कारवाईमध्ये पोलिसांनी दोन लाख तीन हजार रुपये किमतीचे 4000 लिटर गूळ मिश्रित रसायन नष्ट केले आहे.