Team MyPuneCity –जमिनीच्या वादातून (Maval Crime News)तीन जणांनी मिळून शेतकऱ्याला बेदम मारहाण केली. ही घटना 16 मे रोजी दुपारी मावळ तालुक्यातील आंबळे गावात घडली.
गौतम जुगदार, प्रथमेश गौतम जुगदार, ऋषिकेश गौतम जुगदार (सर्व रा. आंबळे, मावळ) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. अमित सयाजी जुगदार (40, कामशेत) यांनी याप्रकरणी सोमवारी (19 मे) याबाबत तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
Pimpri Chinchwad: पिंपरी चिंचवडमध्ये अहिल्यादेवी होळकर यांची ३०० वी जयंती ६ दिवस साजरी होणार; ३१ मे रोजी भव्य मिरवणुकीचे आयोजन
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अमित यांचा ड्रायव्हर शेजारी असलेल्या गौतम जुगदार याच्या घरी बसला होता. त्यामुळे अमित यांनी त्याला आवाज दिला. त्यावेळी आरोपी गौतम याच्या आईने अमित यांना चहा पिण्यासाठी बोलविले. त्यावर ‘तुम्ही माझी जमिन बळकावली आहे. त्यामुळे मी तुमच्याकडे चहा पिणार नाही, असे अमित यांनी सांगितले. या कारणावरून आरोपींनी अमित यांना लाथाबुक्यांनी मारहाण केली. यामध्ये फिर्यादीच्या डाव्या डोळ्याला दुखापत झाली आहे. तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.