Team MyPuneCity –मावळ तालुक्यातील पशूपालकांनी पुणे जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाच्या वैयक्तिक लाभाच्या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन मावळ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी कुलदीप प्रधान आणि पशूवैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल परंडवाल यांनी केले आहे. यासाठी पशूपालकांनी १ जून २०२५ पर्यंत https://ah.mahabms.com या वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज सादर करावेत.
पशूसंवर्धन विभागामार्फत १ जूनपर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करण्याचे आवाहन
२०२५-२६ या वर्षासाठी विविध योजनांअंतर्गत अनुदान उपलब्ध आहे. सर्वसाधारण प्रवर्गातील शेतकऱ्यांना ५० टक्के, तर अनुसूचित जाती व जमातींना ७५ टक्के अनुदानावर दुधाळ गाई म्हशींचे गटवाटप, शेळी-मेंढी गटवाटप, एक हजार मांसल कुक्कुट पक्षांसाठी निवारा शेड उभारणी, शंभर कुक्कुट पिलांचे वाटप आणि २५ तलंगा गटवाटप यांसारख्या योजनांचा समावेश आहे. पशुपालकांना दुधाळ पशुधन, पोल्ट्री किंवा शेळीपालन यापैकी इच्छित योजनेची निवड करण्याची सुविधा उपलब्ध आहे.
Nigdi: भटके विमुक्त परिषदे तर्फे जात प्रमाणपत्र वितरण समारंभ
मावळ तालुक्यातील पशूपालक शेतकरी, सुशिक्षित बेरोजगार युवक-युवती आणि महिलांनी या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन कुलदीप प्रधान यांनी केले आहे. सर्व ग्रामपंचायतींना याबाबत माहिती देण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी दीपक राक्षे, पंचायत समिती मावळ यांच्याशी संपर्क साधावा, असे डॉ. अनिल परंडवाल यांनी सांगितले.