Team MyPuneCity -मावळ तालुक्यातील पवन मावळ येथील युवा नेतृत्वामध्ये सामाजिक क्षेत्रात लक्षणीय योगदान देणाऱ्या अतुल लक्ष्मण कालेकर यांना अविष्कार राज्यस्तरीय महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार त्यांच्या उल्लेखनीय सामाजिक कार्यासाठी देण्यात आला.त्यांनी गरीब आणि सामान्य जनतेला न्याय देण्याचे काम करत असल्याने. त्यांच्या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.
Pune Rain : पुणे आणि लोणावळ्यात मुसळधार सरी, चिंचवडमध्ये सर्वाधिक १०१ मिमी पावसाची नोंद

सामाजिक पुरस्कार मिळाल्याबद्दल बबन कालेकर, संदीप भुतडा, लक्ष्मण भालेराव,भगवान आढाव, रमेश कालेकर,अशोक शेडगे,धोंडू कालेकर,किसन घरदाळे,विजय कालेकर,कैलास कालेकर,नंदू कालेकर,दिनकर आढाव, सुरेश कालेकर, दत्ता कालेकर, संजय मोहोळ, निवृत्ती कालेकर, लक्ष्मण कालेकर,सचिन मोहिते,मुरलीधर कालेकर यांनी अतुल लक्ष्मण कालेकर यांचे अभिनंदन केले आहे. तसेच मावळ तालुक्यातील सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.