situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

March on the Collector Office : एच. एन. डी. सार्वजनिक संस्थेची जमीन वाचवण्यासाठी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

Published On:
March on the Collector Office

जैन समाजबांधवांना सहभागी होण्याचे आवाहन

Team My Pune City – मॉडेल कॉलनी-शिवाजीनगर ( March on the Collector Office) येथील गुरु हिराचंद नेमचंद दोषी (एच. एन. डी.) वसतीगृहाची तीन एकर जमीन वसतीगृह व्यवस्थापनातील काही लोकांनी गोखले कंट्रक्शन कंपनीला २३० कोटी रुपयांमध्ये विकली आहे. त्यासाठीचे कर्जव्यवहारही झाले आहेत. धर्मादाय आयुक्तांनी सर्व कायदे व नियमांना पायदळी तुडवून या सार्वजनिक संस्थेच्या जागा विक्री व्यवहाराला मंजुरी दिली आहे. त्यामुळे या गैरव्यवहाराविरोधात जैन समाजबांधव रस्त्यावर उतरणार आहे. सार्वजनिक संस्थेचा हा जमीन विक्री व्यवहार थांबवण्यासाठी शुक्रवारी (ता. १७) जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा निघणार आहे. सकाळी ९ वाजता गुरु हिराचंद नेमचंद दोषी वसतीगृहाजवळ मोर्चाची सुरवात होईल. जैन समाजबांधवांनी या मोर्चामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन सकल जैन समाज संस्थेने केले आहे.

Pune Cooperative Bank : रिझर्व्ह बँकेने पुणे सहकारी बँकेवरील निर्बंध हटवले

प्रसिद्धीपत्रकाद्वारे याबाबतची माहिती देण्यात आली आहे. या प्रसिद्धीपत्रकात ( March on the Collector Office) म्हटले आहे की, मॉडेल कॉलनीमध्ये सन १९५८ मध्ये सकल जैन समाजाचे गुरु हिराचंद नेमचंद दोषी यांनी तीन एकर जागेत एक धर्मादाय संस्था स्थापन केली. लोकसहभागातून निधी उभा करून गोरगरीब मुलांच्या शिक्षणासाठी वसतीगृह उभारले. राज्यभरातून आलेले विद्यार्थी वसतीगृहात राहात होते. मात्र, त्यांच्या काही वारसदारांनी ही ३ एकर जागा गोखले कंट्रक्शन कंपनीस २३० कोटी रकमेत विकली आहे. त्यासाठी कंपनीने १ आक्टोबरला कर्नाटकातील दिनेश्वर पतसंस्थेकडून ५० कोटी व बुलढाणा अर्बन पतसंस्थेकडून २० कोटी कर्ज मंजूर करून घेतले आहे. त्यामुळे ही हिराचंद नेमचंद दोषी सार्वजनिक संस्थेच्या मालकीची जागा गोखले कंट्रक्शन कंपनी स्वतःच्या घशात घालू शकते.

Paranjape Vidya Mandir : परांजपे विद्यामंदिरात अत्याधुनिक संगणक दालनाचे उद्घाटन

पुणे विभागाच्या धर्मादाय आयुक्तांनी कायदे व नियमांची पायमल्ली केली करुन विक्री व्यवहाराला मंजुरी दिली आहे. धर्मादाय आयुक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे नातेवाईक आहेत. गोखले कंट्रक्शन कंपनीमध्ये केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ हे भागीदार आहेत. त्यामुळे काही व्यक्ती राजाश्रयाने ही जागा हडप करण्याचा प्रयत्न करत आहेत. ही बाब अत्यंत गंभीर ( March on the Collector Office) आहे.

सदर गैरव्यवहार थांबवून हिराचंद नेमचंद दोषी सार्वजनिक संस्थेच्या मालकीची जागा वाचवण्यासाठी जैनाचार्य श्री गुप्तीनंदाजी गुरुदेव महाराजांच्या मार्गदर्शनाखाली सकल जैन समाजाच्या वतीने अहिंसक पद्धतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. पुणे व पिंपरी-चिंचवडमधील जैन समाजबांधवांनी तसेच सामाजिक संस्थांनी व राजकीय पक्षांनी या मोर्चात सहभागी होऊन हिराचंद नेमचंद दोषी सार्वजनिक संस्थेच्या मालकीची जागा वाचवावी, असे प्रसिद्धीपत्रकात ( March on the Collector Office) म्हटले आहे.

Follow Us On