situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Marathi Movie: सस्पेन्स थ्रीलर ‘शातिर – द बिगिनिंग’  येत्या 13 जून रोजी होणार प्रदर्शित

Published On:

ड्रग्ज माफियाविरुद्ध महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा संघर्ष दिसणार मोठ्या पडद्यावर

Team MyPuneCity –’नडायची मस्ती आणि भिडायची खाज आम्ही कॉलेजची पोरं बरोबरच घेऊन चालतो’, किंवा ‘… तर ही वानरसेना तुझ्या सोन्याच्या लंकेची राख रांगोळी करेल,असा इशारा अट्टल गुन्हेगारांना देणारा ‘शातिर – द बिगिनिंग’  या मराठी चित्रपटाचा ट्रेलर सोशल मिडियावर नुकताच लॉन्च झाला आहे. या ट्रेलर मुळे आधीच चर्चेत असलेल्या या चित्रपटाबद्दल उत्सुकता निश्चितपणे वाढवली गेली आहे. सस्पेन्स थ्रीलर ‘शातिर – द बिगिनिंग’  येत्या 13 जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. अशी माहिती चित्रपटाच्या टीमने पत्रकार परिषदेत दिली, तत्पूर्वी चित्रपटातील कलाकारांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची महाआरती केली आणि श्री शंकर महाराज समाधी स्थळाला भेट देऊन त्यांचे आशीर्वाद घेतले.

आजच्या  तरुणाईची कथा सांगणारा, सत्य कथेवर आधारित शातिर -द बिगिनिंग या चित्रपटाची निर्मिती श्रियांश आर्ट्स अँड मोशन पिक्चर्सच्या माध्यमातून रेश्मा वायकर यांनी केली आहे. या चित्रपटा द्वारे सुनील सुशीला दशरथ वायकर यांनी दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले आहे. आजच्या तरुण पिढीला पडलेला अंमलीपदार्थांचा विळखा, ड्रग्स माफिया आणि पोलीस यंत्रणेच्या संघर्ष, व्यसनाधीनता, गुन्हेगारी यांच्याविरुद्ध महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी उभारलेला लढा या चित्रपटात प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.

या बद्दल बोलताना दिग्दर्शक सुनील वायकर म्हणाले, शातिर -द बिगिनिंग हा चित्रपट माझा दिग्दर्शक म्हणुन पाहिलाच प्रयत्न आहे. समाजातील अंमली पदार्थाच्या सेवनामुळे होणारी व्यसनाधीनता आणि त्यामुळे वाढणारी गुन्हेगारी त्या विरुद्धचा कॉलेज मधील विद्यार्थ्यांचा लढा या चित्रपटातून दाखवून एक सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे. देशावर परकीय दहशतवादाचे जसे संकट आहे तसेच ड्रग्ज हे अंतर्गत दहशतवाद आहे असे म्हंटले तर वावगे ठरणार नाही.

चित्रपटाच्या निर्मात्या, अभिनेत्री रेश्मा वायकर म्हणाल्या, चित्रपटातील ‘पोरी आम्ही मराठी पोरी’ या गीताला मिळणारा प्रतिसाद आमचा उत्साह वाढवणारा आहे. आज आपल्या समाजात अंमलीपदार्थ सहजतेने मिळत आहेत, ते घेणाऱ्या तरुणाईचे प्रमाण वाढत आहे, विद्येचे माहेरघर, सांस्कृतिक राजधानी असलेले पुणे शहर अशाच प्रकरणामुळे मधल्या काळात चर्चेत होते. या दुष्ट प्रवृत्ती विरुद्ध लढा देणाऱ्या महाविद्यालयीन तरुणाईची ही कथा आहे. अॅक्शनपॅक्ड अशी नायिका साकारणे माझ्यासाठी आव्हानात्मक होते.



Chinchwad: “पर्यावरण दिनी ‘एक झाड एक आशा’ उपक्रम: आमदार अमित गोरखे यांचा विद्यार्थ्यांसह हिरवा संकल्प”

शातिर – द बिगिनिंग या चित्रपटात अभिनेत्री रेश्मा वायकर या प्रमुख भूमिकेत असून ज्येष्ठ अभिनेते योगेश सोमण, रमेश परदेशी, अनिल नगरकर, मीर सरोवर, रामेश्वर गीते, रमा नाडगौडा, निशांत सिंग, वेद भालशंकर, अभिमन्यु वायकर यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाला रोहित नागभिडे यांचे संगीत असून वैभव देशमुख गीतकार आहेत. चित्रपटातील गीतांना वैशाली सामंत, मुग्धा कऱ्हाडे, श्याल्मली खोलगडे  यांनी स्वरसाज चढवला आहे.

सत्य घटनेवर आधारित, तरुणाईतील ड्रग्ज, व्यसनाधीनता असा संवेदनशील विषय घेऊन येणारा, सस्पेन्स थ्रीलर असलेला  शातिर – द बिगिनिंग हा मराठी चित्रपट येत्या 13 जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

Follow Us On