situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Marathi Movie: शातिर आता १३ जून पासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात…

Updated On:

मराठी चित्रपट प्रदर्शनाच्या अनियंत्रित जत्रेतून “शातिर” चित्रपटाची माघार….

Team MyPuneCity -मराठी चित्रपटसृष्टीत दरवर्षी शंभराहून अधिक चित्रपट निर्माण होतात, म्हणजे प्रत्येक आठवड्याला किमान दोन मराठी चित्रपट येणार हे निश्चित आहे. परंतु मराठी चित्रपट प्रदर्शित होण्यावर कोणत्याही संस्थेचे, चित्रपट महामंडळाचे नियंत्रण नसल्याने अनेकदा तीन – चार मराठी चित्रपट एकाच आठवड्यात येतात यामुळे कोणत्याच चित्रपटाला प्राइम टाइम मिळत नाही, 23 मे रोजी तर तब्बल सात मराठी चित्रपट प्रदर्शित होणार होते. ही मराठी चित्रपटांची अनियंत्रित स्पर्धा टाळण्यासाठी शातिर द बिगिनिंग च्या निर्मात्यानी एक पाऊल टाकले असून आता 13 जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.

‘… तर ही वानरसेना तुझ्या सोन्याच्या लंकेची राख रांगोळी करेल, असा इशारा अट्टल गुन्हेगारांना देणारा शातीर चित्रपटाचा ट्रेलर सोशल मिडियावर नुकताच लॉन्च झाला आहे. या ट्रेलर मुळे आधीच चर्चेत असलेल्या या चित्रपटाबद्दल उत्सुकता निश्चितपणे वाढवली जाणार आहे. चित्रपटाच्या पोरी आम्ही मराठी पोरी…. या गाण्याप्रमाणेच टीजर आणि ट्रेलरला मराठी पेक्षकांच्या पसंतीची पावती मिळाली आहे.

Pune Rain : पुणे आणि लोणावळ्यात मुसळधार सरी, चिंचवडमध्ये सर्वाधिक १०१ मिमी पावसाची नोंद

सध्याच्या तरुणाईची कथा सांगणारा, सत्य कथेवर आधारित शातीर, द बिगिनिंग या चित्रपटाची निर्मिती श्रियांश आर्ट्स अँड मोशन पिक्चर्सच्या माध्यमातून रेश्मा वायकर यांनी केली आहे. या चित्रपटा द्वारे सुनील सुशीला दशरथ वायकर यांनी दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले आहे. सध्याच्या तरुण पिढीला पडलेला अमली पदार्थांचा विळखा, ड्रग्स माफिया आणि पोलीस यंत्रणेच्या संघर्ष, व्यसनाधीनता, गुन्हेगारी यांच्याविरुद्ध महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी उभारलेला लढा या चित्रपटात प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.

या बद्दल बोलताना दिग्दर्शक सुनील वायकर म्हणाले, शातिर The Beginning माझा दिग्दर्शक म्हणुन पाहिलाच प्रयत्न आहे. समाजातील अंमली पदार्थाच्या सेवनामुळे होणारी व्यसनाधीनता आणि त्यामुळे वाढणारी गुन्हेगारी त्या विरुद्धचा कॉलेज मधील विद्यार्थ्यांचा लढा या चित्रपटातून दाखवून एक सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे. 23 मे रोजी आम्ही चित्रपट रिलीज करणार होतो मात्र ऐनवेळी काही निर्मात्यांनी याच दिवशी त्यांचे चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला यामुळे आम्ही पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे.

चित्रपटाच्या निर्मात्या, अभिनेत्री रेश्मा वायकर म्हणाल्या, चित्रपटाची गाणी, ट्रेलर याला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. चित्रपट प्रदर्शनासाठीची आमची संपूर्ण तयारी झालेली आहे, परंतु एकाच वेळी सात मराठी चित्रपट नको म्हणून आम्ही आमचे प्रदर्शन पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. चित्रपट महामंडळाने एखादी समिती तयार करून एका वेळी दोन किंवा तीन पेक्षा अधिक चित्रपट प्रदर्शित होणार नाहीत यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. कारण एका वेळी 5 – 7 मराठी चित्रपट आले तर कुणालाही प्रेक्षक मिळणार नाही आणि पर्यायाने निर्माते म्हणजेच पर्यायाने संपूर्ण मराठी चित्रपटसृष्टीला याची झळ बसणार आहे.

शातिर The Beginning या चित्रपटात रेश्मा वायकर या प्रमुख भूमिकेत असून योगेश सोमण, रमेश परदेशी, मीर सरोवर, रामेश्वर गीते, गौरव रोकडे, निशांत सिंग, मनोज चौधरी यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाला रोहित नागभिडे यांचे संगीत असून वैभव देशमुख गीतकार आहेत. चित्रपटातील गीतांना वैशाली सामंत, मुग्धा कऱ्हाडे यांनी स्वरसाज चढवला आहे.

सत्य घटनेवर आधारित, तरुणाईतील ड्रग्ज, व्यसनाधीनता असा संवेदनशील विषय घेऊन येणार, सस्पेन्स थ्रीलर असलेला शातिर The Beginning हा मराठी चित्रपट येत्या 13 जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

Follow Us On