situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Manoj Jarange: मनोज जरांगे पाटलांच्या ‘या’ मागण्या सरकारकडून मान्य; पहा कोणत्या आहेत मागण्या

Updated On:
Manoj Jarange Patil

Team My Pune City –मनोज जरांगे मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण (Manoj Jarange)मिळावे यासाठी आझाद मैदानावर आमरण उपोषणाला बसलेले आहेत. काहीही झालं तरी मी मागे हटणार नाही, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले होते. आज त्यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस आहे. आज मराठा उपसमितीच्या सदस्यांनी आज मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली. त्यानंतर आता राज्य सरकारने जरांगे यांच्या मागण्यांची दखल घेतली आहे. राज्य सरकारने हैदराबाद संस्थानच्या गॅझेट लागू करणार असल्याचे सांगितले आहे.

हैद्राबाद गॅझेट लागू होणार
मनोज जरांगे पाटलांनी हैद्राबाद गॅझेटिअरची अंमलबजावणी करण्यात यावी ही मागणी केली होती. त्यावर सरकारने निर्णय केला आहे. हैद्राबाद गॅझेटिअरच्या अंमलबजावणीसाठी मान्यता देत आहोत. त्यानुसार मराठा जातीतील व्यक्तींना गावातील, कुळातील व्यक्तीचे कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळाले असल्यास चौकशी करून कार्यवाही करण्यात येईल, असं सरकारने म्हटलं आहे. थोडक्यात आपल्या भाषेत सांगायचं ठरलं. हैद्राबाद गॅझेटिअरच्या अंमलबजावणीला परवानगी दिली आहे.

Devendra Fadnavis: सिंहगड रस्त्यावर पुण्यातील सर्वात मोठा उड्डाणपूल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण करून वाहतुकीसाठी झाला खुला

Prashant Bhagwat: गणपती मंडळ भेट दौऱ्यात गावागावांत आनंदोत्सव;प्रशांत भागवत यांच्या स्वागतावेळी फटाक्यांची आतषबाजी

सातारा संस्थानचे गॅझेट लागू होणार
सातारा संस्थानच्या गॅझेटिअरमध्ये पश्चिम महाराष्ट्र पूर्ण बसतो. सातारा गॅझेटिअर, पुणे औंध गॅझेटिअरच्या आधीन राहून अंमलबजावणी करण्याची आपली मागणी होती. सातारा आणि औंध गॅझेटिअरची कायदेशीर तपासून जलदगतीने निर्णय घेऊ असं सरकारने म्हटलं आहे. मी का म्हटलं. तर त्यात काही कायदेशीर त्रुटी आहेत, असं त्यांनी म्हटलं. त्यांनी 15 दिवसात काम करू असं म्हणाले. राजेसाहेब साक्षीदार आहेत. राजे म्हणाले 15 दिवसात अंमलबजावणी करू. मी म्हटलं 15 दिवस नाही, 1 एक महिन्यात करा. या दोन विषयाची अंमलबजावणी झाली आहे. असे जरांगे पाटील म्हणाले

सर्व केसेस मागे घेणार
महाराष्ट्रातील आंदोलकांवरी केसेस मागे घेण्याची मागणी होती. काही ठिकाणचे गुन्हे मागे घेतले आहेत. काही गुन्हे कोर्टात आहेत.सप्टेंबर अखेरपर्यंत सर्व केसेस मागे घेऊ असं ते म्हणाले आहेत. त्यामुळे ही मागणीही मान्य झाली आहे. असे जरांगे यांनी सांगितले.

बलिदान दिलेल्यांच्या वारसांना नोकरी द्या
‘ या आंदोलनात बलिदान दिलेल्या व्यक्तींना तात्काळ मदत आणि नोकरी देण्याची मागणी केली होती. कुटुंबीयांच्या वारसांना 15 कोटी मदत यापूर्वी दिली आहे. उर्वरीत कुटुंबीयांना एका आठवड्याच्या आत आर्थिक मदत खात्यावर येईल. नोकरी राज्य परिवहन मंडळात नोकरी देऊ असं सरकार म्हणालं आहे. त्यामुळे ही मागणीही मान्य झाली आहे.

ग्रामपंचायतीत नोंदींचे रेकॉर्ड ठेवणार
58 लाख नोंदीचा रेकॉर्ड ग्रामपंचायतीत लावा अशी जरांगे पाटलांनी मागणी केली होती. त्याप्रमाणे आता 58 लाख नोंदीचा रेकॉर्ड ग्रामपंचायतीत लावण्यात येत आहेत.

कुणबी – मराठा एकच असल्याचा जीआर काढा
जरांगे पाटील म्हणाले की, ‘मराठा आणि कुणबी एक आहे हा जीआर काढा असं आपण म्हटलं आहे. सरकारच म्हणणं आहे प्रकिया थोडी किचकट आहे. महिनाभराचा वेळ द्या. आधी हे करू. किचकट नाही. हे माहीत आहे. मी म्हटलं महिना नाही दीड महिना दोन महिना घ्या. त्यामुळे आपण त्यांना दोन महिन्याचा वेळ देत आहोत.

सगे सोयऱ्यांचा मुद्दा
सगे सोयऱ्यांच्या मुद्द्यावर 8 लाख हरकती आल्या आहेत. त्याला वेळ लागणार आहे .असं सरकारने म्हटलं आहे.त्यासाठी वेळ देऊ असा जरंगे म्हणाले.

वंशावळ समिती गठीत करा

वंशावळ समिती गठीत करा. शिंदे समितीला कार्यालय नाही ते द्या.अशी मागणी पाटील यांनी केली.

Follow Us On