Team My Pune City – मराठा आरक्षण ( Manoj Jarange Patil vs Dhananjay Munde) आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी त्यांच्या हत्येचा कट रचण्यात आल्याचा खळबळजनक दावा केला आहे. या कटासाठी तब्बल अडीच कोटी रुपयांची सुपारी दिल्याची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली. याप्रकरणी जालना पोलिसांनी बीड जिल्ह्यातून दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे.
जरांगे यांचा दावा
जरांगे यांनी सांगितले की, बीडमधील काही कार्यकर्त्यांनी आरोपींशी( Manoj Jarange Patil vs Dhananjay Munde) संपर्क साधून प्रथम खोटे रेकॉर्डिंग तयार करण्याचा कट रचला. नंतर त्यांचा खून करण्याचा निर्णय झाला. त्यांनी आरोप केला की, बीडमधील कांचन पाटील हा धनंजय मुंडे यांचा कार्यकर्ता असून त्याने आरोपींना परळी येथे नेऊन बैठक घडवून आणली. या बैठकीत हत्येची डील झाली आणि त्यासाठी अडीच कोटी रुपयांची सुपारी देण्यात आली.
समाजाला आवाहन
जरांगे यांनी मराठा समाजाला शांत राहण्याचे आवाहन करत ( Manoj Jarange Patil vs Dhananjay Munde) म्हटले की, “मी आहे तोपर्यंत तुम्हाला टेन्शन नाही. मी मेल्यानंतर तुम्ही काय करायचे ते करा. पण मी जिवंत असताना तुम्ही शांततेने राहा.” त्यांनी पुढे सांगितले की, “असल्या वृत्तीचा नायनाट करावा लागणार. आज माझ्यावर वेळ आली आहे, उद्या तुमच्यावरही येऊ शकते.”
धनंजय मुंडे यांची प्रतिक्रिया
या आरोपांवर माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषद घेऊन सर्व आरोप फेटाळले.( Manoj Jarange Patil vs Dhananjay Munde)
“माझ्या मनात पाप असेल तर माझी ब्रेन मॅपिंग आणि नार्को टेस्ट करा. पण माझ्यासोबत जरांगे आणि आरोपींचीही करा, म्हणजे दूध का दूध, पाणी का पाणी होईल,” असे त्यांनी स्पष्ट केले. मुंडे यांनी या प्रकरणाची चौकशी CBI कडून व्हावी अशी मागणी केली. तसेच, ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळावे, ही आपली प्रामाणिक भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले.
या आरोप-प्रत्यारोपामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा वाद निर्माण झाला आहे. एका बाजूला जरांगे यांनी हत्येच्या कटाचा दावा करत समाजाला शांततेचे आवाहन केले आहे. तर दुसऱ्या बाजूला धनंजय मुंडे यांनी आरोप फेटाळून चौकशी CBI कडून व्हावी अशी मागणी केली ( Manoj Jarange Patil vs Dhananjay Munde) आहे.


















