Team My pune city – मराठा समाजाला आरक्षण मिळावे,या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील ( Manoj Jarange Patil) पुणे दौऱ्यावर आहेत.
मराठा आरक्षणासाठी लढणारे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील ( Manoj Jarange Patil) यांच्या मराठा आरक्षण संदर्भातील प्रमुख मागण्या मान्य न झाल्यास ते २९ ऑगस्ट रोजी मुंबईत जाऊन बेमुदत उपोषण सुरू करणार आहेत. याचा स्पष्ट इशारा ही सरकारला त्यांनी दिला आहे. याच निमित्त ते महाराष्ट्र राज्यातील विविध भागात दौरे करत आहेत.काल पासून कुरुळीमध्ये पुणे भागातील अनेक मराठा समाजातील बांधव त्यांच्या गाठीभेटी घेत आहेत.
Pune Media Conference : विवेकी आणि प्रभावी वापर सायबर पत्रकारितेत आवश्यक
जरांगे पाटील हे अंतरवली वरून मुंबई कडे अहिल्यानगर मार्गे मार्गक्रमण करणार आहे. पुणे व नाशिक जिल्हावार मोठी जबाबदारी राहणार आहे.मुंबईत गेलेल्या मराठ्यांना अन्न पुरवठ्याची जबाबदारी या जिल्ह्याकडे देण्यात आली आहे. रेल्वेतून सकाळ संध्याकाळ ते अन्न आणू शकतात.तसेच मुंबईतील सर्व नागरिक मराठ्यांची त्या संदर्भातील सेवा पूर्ण करतील.
आरक्षण संदर्भातील प्रमुख मागण्या पूर्ण करून घेणार. ५८ लाख कुणबी नोंदीचा अहवाल आहे, कायदा पारित करण्या करता आधार लागतो. तो अहवाल आहे,तो जी आर घेणार आहे. मराठ्यांचा न भूतो न भविष्यती असा ऐतिहासिक विजय असणार आहे. प्रत्येकाने यात साक्षीदार व्हावे. सणवार पाहणार नाही. सर्व मराठे मुबंईत येतील. सरकारला वेळ दिला आहे, आता आरक्षण भेटल्या शिवाय मुंबई सोडणार नाही, असे यावेळी जरांगे पाटील ( Manoj Jarange Patil) म्हणाले.