Team MyPuneCity – मांजरी बुद्रुक भागात पिस्तूल व लोखंडी हत्यार घेऊन दहशत माजवणाऱ्या टोळीचा हडपसर पोलिसांनी पाठलाग करून पर्दाफाश केला आहे. गोळी झाडून खून करण्याचा प्रयत्न करणाऱ्या या टोळीतील पाच आरोपींना पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्या ताब्यातून गावठी बनावटीचे पिस्तूल जप्त करण्यात ( Manjari Crime News) आले आहे.
ही घटना दिनांक २९ मे २०२५ रोजी गार्गी एंटरप्रायजेससमोर, मांजरी बुद्रुक येथे घडली. फिर्यादी यांचा मुलगा तेथे उभा असताना, सुमित उर्फ विलास खवळे याने जवळील पिस्तूलमधून त्याच्यावर गोळी झाडून त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्याच्यासोबत वैभव गवळी याने लोखंडी हत्यार घेऊन पाठलाग करत खून करण्याचा प्रयत्न केला. या दोघांसोबत आणखी ( Manjari Crime News) चार अनोळखी तरुणांनी बेकायदेशीर जमाव जमवला होता.
Pune Crime News : सराफी पेढीतील कर्मचारी तरुणाने साडेचार कोटी रुपयांच्या दागिन्यांची केली चोरी
या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस निरीक्षक संजय मोगले व गुन्हे निरीक्षक निलेश जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली दोन स्वतंत्र पथके तयार करण्यात आली. या पथकांनी तातडीने तपास सुरू करून खालील आरोपींना अटक केली:
- सुमित उर्फ विलास दत्ता खवळे (वय २०, रा. सासवड रोड, सातववाडी, हडपसर)
- साहिल बाबुराव जगताप (वय २०, रा. घवाटे वस्ती, मांजरी)
- बसवराज विजय सुतार (वय २४, रा. केशवनगर, मुंढवा)
- वैभव श्रावण गवळी (वय २२, रा. केशवनगर, मुंढवा)
- सचिन गंगाराम रेनके (वय ३५, रा. इंदिरानगर, शिरूर) – याच्याकडून पिस्तूल घेतले होते.
या पाचही आरोपींनी गुन्हा केल्याची कबुली दिली असून त्यांनी वापरलेले गावठी पिस्तूल पोलिसांनी हस्तगत केले आहे.
सदर कारवाई ही अपर पोलीस आयुक्त (पूर्व) मनोज पाटील, पोलीस उपआयुक्त परिमंडळ ५ डॉ. राजकुमार शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त हडपसर श्रीमती अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात ( Manjari Crime News) आली.
ही यशस्वी कारवाई पोलीस उपनिरीक्षक हसन मुलाणी, सत्यवान गेंड यांच्यासह अंमलदार अविनाश गोसावी, दीपक कांबळे, अमित साखरे, निलेश किरवे, बापू लोणकर, अमोल दणके, अजित मदने, अभिजीत राऊत, तुकाराम झुंजार, महेश चव्हाण, कुंडलीक केसकर, चंद्रकांत रेजितवाड, महावीर लोंढे, लखन दांडगे, सागर कुंभार यांच्या पथकाने पार पाडली.
या कारवाईमुळे मांजरी परिसरात दहशत माजवणाऱ्या टोळीला चांगलाच दणका बसला आहे. पुढील तपास हडपसर पोलीस करीत ( Manjari Crime News) आहेत.