Team MyPuneCity — भारत सरकारच्या नशामुक्त भारताच्या उद्दिष्टानुसार अंमली पदार्थाच्या विक्री, वितरण व गैरवापराविरोधात MANAS (National Narcotics Helpline) (MANAS Helpline) ही हेल्पलाईन क्रमांक १९३३ सुरु करण्यात आली असून, पिंपरी चिंचवडमधील नागरिकांना या क्रमांकावर संपर्क करून माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
अंमली पदार्थविरोधी कार्यवाही अधिक प्रभावी करण्यासाठी केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाच्या आदेशानुसार राष्ट्रीय स्तरावर ही हेल्पलाईन ११ जानेवारी २०२५ पासून २४x७ कार्यरतआहे. नागरिकांनी आपल्या परिसरात अंमली पदार्थांची बेकायदेशीर विक्री, तस्करी किंवा वापर होत असल्यास गुप्तता राखून १९३३ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस उप आयुक्त (गुन्हे) संदीप डोईफोडे (MANAS Helpline) यांनी केले आहे.
Senior Citizens : महात्मा फुलेनगर ज्येष्ठ नागरिक संघाचा १२वा वर्धापन दिन उत्साहात
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत अनेक ठिकाणी अंमली पदार्थांची तस्करी व वितरणाची माहिती वेळोवेळी समोर येत असते. त्यामुळे नागरिकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरत असून, सहकार्य मिळाल्यास अंमली पदार्थविरोधातील लढा अधिक परिणामकारक होऊ शकतो, असेही पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
नशामुक्त भारत २०४७ या दृष्टीकोनातून राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमासाठी MANAS हेल्पलाईनचा (MANAS Helpline) प्रभावी वापर होणे गरजेचे असून, नागरिकांनी सामाजिक जबाबदारी म्हणून या मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.