Team MyPuneCity – “हिंदू आणि भगवा कधीही( Malegaon blast case) दहशतवादी नसतो,” हे शब्द होते समीर कुलकर्णी यांचे, जे तब्बल १७ वर्षांनंतर मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातून निर्दोष सिद्ध होऊन काल रात्री चिंचवडच्या बिजलीनगरमधील आपल्या घरी परतले.

न्यायालयाने मालेगाव स्फोट प्रकरणातील सर्व सातही आरोपींना निर्दोष घोषित करत त्यांच्या आयुष्यातील एक दीर्घ काळाचा अन्याय संपवला. यात चिंचवडचे समीर कुलकर्णी हेही एक होते. २००८ साली अटक झाल्यानंतर तब्बल १७ वर्ष समीर यांनी अनेक संकटं, वेदना, आणि सामाजिक बहिष्कार सहन केला. वकीलशिवाय न्यायालयीन लढाई लढत त्यांनी आपली निर्दोषता सिद्ध केली.


“४५ दिवस सूर्यप्रकाश पाहिला नव्हता”
समीर म्हणतात, “मी काहीही चुकीचं केलं नव्हतं, म्हणूनच मला आत्मविश्वास होता की एक दिवस सत्याचा विजय होईल. ४५ दिवस मी सूर्यप्रकाशदेखील पाहिला नव्हता, पण मनातली श्रद्धा आणि तुमच्या सर्वांच्या सदिच्छा यामुळे आज मी इथं उभा ( Malegaon blast case) आहे.”
मातोश्रींच्या अश्रूंना बांध न राहिला
मुलगा तब्बल १७ वर्षांनी घरी परतल्याचा क्षण अनुभवताना समीर कुलकर्णी यांच्या मातोश्रींना अश्रूंना बांध ठेवता आला नाही. त्या म्हणाल्या, “काहीही चूक नसताना माझ्या समीरला एवढा मोठा त्रास झाला, ही शिक्षा अन्याय्य व कठोर ( Malegaon blast case) होती.”
‘जय श्रीराम’च्या घोषणांनी परिसर दुमदुमला
बिजलीनगरमध्ये समीर कुलकर्णी यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. फुलांच्या रांगोळ्या, पायघड्या, पुष्पवृष्टी, औक्षण, आणि पेढ्यांचे वाटप अशा पारंपरिक पद्धतींनी परिसर आनंदित झाला. पाच सुवासिनींनी औक्षण करत त्यांना पुन्हा आपल्या घरात प्रवेश( Malegaon blast case) दिला.
संघ कार्यकर्त्यांची उपस्थिती
या वेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे हिंजवडी गट कार्यवाह श्रेयस ठाकरे, ज्येष्ठ कार्यकर्ते संजय कुलकर्णी, माजी उपमहापौर सचिन चिंचवडे, तसेच युवराज अहिरे, महेश टेंभुर्णे, रजनी वाघ, जोशी काकू आणि अन्य स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित ( Malegaon blast case) होते.
Vadgaon Maval News : वडगावातील अवैध धंदे बंद करण्याची शहर भाजपाची मागणी
देशसेवेसाठी स्वतःला वाहिलेलं आयुष्य
समीर कुलकर्णी यांनी देश कार्यात अडथळा येऊ नये म्हणून लग्न न करण्याचा ( Malegaon blast case) निर्णयही घेतला, असे त्यांचे सहकारी सांगतात. ‘अभिनव संघटना’ या माध्यमातून ते देशहितासाठी कार्यरत होते. “माझ्या भेटीला येऊ नका, तुम्हालाच त्रास होईल” असं म्हणणारे समीर आज म्हणतात, “मी निर्दोष असल्याचं न्यायालयात सिद्ध झालं आहे, आता कोणताही संकोच न ठेवता भेटा.”
घरच्या माणसांचे गहिवरलेले स्वागत
वयस्कर आई, लहान भाऊ, भावजय व पुतणी यांनी फुलांच्या पायघड्यांवरून समीरला घरात घेतलं, आणि पुन्हा एकदा त्याच्या अस्तित्वाला घराने आलिंगन ( Malegaon blast case) दिलं.