Team My Pune City –मनोज जरांगे मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून (Mahesh Landge)आरक्षण मिळावे यासाठी आझाद मैदानावर आमरण उपोषणाला बसलेले आहेत. काहीही झालं तरी मी मागे हटणार नाही, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले होते. त्यानंतर आता राज्य सरकारने जरांगे यांच्या मागण्यांची दखल घेतली आहे. राज्य सरकारने हैदराबाद संस्थानच्या गॅझेट लागू करणार असल्याचे सांगितले आहे.
भाजपा आमदार महेश लांडगे म्हणाले ,मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत (Mahesh Landge)मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वातील भाजपा महायुती सरकारने ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे समाजातील भावी पिढ्यांना शैक्षणिक आणि नोकरीमध्ये संधीची दालने खुली होणार आहेत. समाजाची मागणी अखेर मान्य झाली. याहून मोठे समाधान नाही. मराठा आंदोलनाचे नेते मनोजदादा जरांगे-पाटील आणि समाजबांधवांचे अभिनंदन करतो. आरक्षणाच्या मुद्यावर देवेंद्रजी आणि भाजपाला राजकीय हेतुने दुषणे दिली. पण, अखेर देवेंद्रजींनीच मराठा समाजासाठी प्रामाणिक निर्णय घेतले. मराठ्यांचा हा लढा इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद होईल.
Devendra Fadnavis: सिंहगड रस्त्यावर पुण्यातील सर्वात मोठा उड्डाणपूल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण करून वाहतुकीसाठी झाला खुला
पिंपरी-चिंचवडमधील भूमिपुत्रांना 12.5 टक्के परतावा, सरसकट शास्तीकर माफी, मेट्रो विस्तार, प्रधानमंत्री आवास योजनेची प्रभावी अंमलबजावणी करणारे देवेंद्रजी मराठा बांधवांच्या मागण्यांबाबत निश्चितपणे सकारात्मक निर्णय घेतील, असा विश्वास होता. राज्यातील बहुसंख्य मराठा बांधवांना हक्काचे आरक्षण भाजपा महायुतीची सत्ताकाळात आणि देवेंद्रजींच्या नेतृत्त्वात मिळते आहे, याचा अपार आनंद आहे.
- महेश लांडगे, आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड, पुणे.