Team My Pune City – भोसरी एमआयडीसीमध्ये गेल्या 2 वर्षांपासून एका औद्योगिक ग्राहकाकडून रिमोटचा वापर करुन केली जाणारी वीजचोरी (Mahavitran) महावितरणने नुकतीच उघडकीस आणली असून, या ग्राहकाकडून महावितरणने 19 लाख 19 हजारांचा दंड वसूल केला आहे. तसेच वीजचोरीसाठी वापरले जाणारे साहित्य जप्त केले आहे.
Pimpri-Chinchwad Fire Station : पिंपरी-चिंचवडमध्ये नव्या अग्निशमन केंद्रांची उभारणी वेगात
गणेशखिंड मंडलाचे अधीक्षक अभियंता सिंहाजीराव गायकवाड व भोसरी विभागाचे कार्यकारी अभियंता अतुल देवकर यांनी खास पथक तया केले. अतिरिक्त कार्यकारी अभियंता यांच्या नेतृत्वाखाली सहा. अभियंता गजानन झापे, वीज कर्मचारी (Mahavitran) हर्षद लोखंडे, सोमनाथ गायकवाड, महेश वाघमारे यांनी भोसरी एमआयडीसीमध्ये तपासणी सुरु केली. तेंव्हा मे. गणेश प्रेसिंग या औद्योगिक ग्राहकाकडून रिमोटद्वारे वीजचोरी केली जात असल्याचे आढळले.
Dehuroad Accident : भरधाव वेगातील कारची दुचाकीला धडक
वीजचोरीसाठी वापरलेले सर्व साहित्य महावितरणने जप्त केले आहे. तसेच या ग्राहकाला मागील दोन वर्षांमध्ये केलेल्या 77 हजार 270 युनीटच्या वीजचोरी पोटी 19 लाख 19 हजार 362 रुपयांचा दंड व 2 लाख 30 हजारांचे तडजोड आकाराचे देयक देत दंड वसूल करण्यात आला आहे. महावितरणच्या या कारवाईमुळे वीजचोरांचे धाबे दणाणले (Mahavitran) आहेत.