situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Mahavitaran : महावितरण राज्यस्तरीय नाट्यस्पर्धेत पुण्याचे ‘डॉक्टर, तुम्ही सुद्धा!’ सर्वोत्कृष्ट

Published On:
Mahavitaran

नागपूरचे ‘रंगबावरी’ नाट्यकृती द्वितीय

Team My pune city – नाशिक येथे संपन्न झालेल्या महावितरणच्या राज्यस्तरीय आंतरप्रादेशिक नाट्यस्पर्धेत पुणे प्रादेशिक विभागाच्या ( Mahavitaran)संघाने ‘डॉक्टर, तुम्ही सुद्धा’ या नाटकाचे सर्वोत्कृष्ट सादरीकरण करीत प्रथम क्रमांकाचा करंडक पटकाविला. तर नागपूर प्रादेशिक विभागाचे ‘रंगबावरी’ या नाटकाला द्वितीय क्रमांकाचा मान मिळाला.

नाशिक येथील महाकवी कालिदास कलामंदिरात महावितरणच्या राज्यस्तरीय आंतरप्रादेशिक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. अतिशय दर्जेदार व विविध विषयांचा वेध घेत घेणाऱ्या चारही प्रादेशिक विभागाच्या नाट्यकृतींना नाशिककर रसिकांनी मोठा ( Mahavitaran)प्रतिसाद दिला. या नाट्यस्पर्धेतील सांघिक, वैयक्तिक विजेते व उपविजेत्यांचे महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र व संचालक (मानव संसाधन) श्री. राजेंद्र पवार यांनी अभिनंदन केले आहे.

Unauthorized flex : अनधिकृत फ्लेक्स प्रिंट करणाऱ्या प्रिंटर युनिट्सना अंतिम नोटीस ; कायदेशीर कारवाईचा इशारा

दोन दिवसीय राज्यस्तरीय नाट्यस्पर्धेचा बुधवारी (दि. ६ ) सायंकाळी समारोप झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोकण प्रादेशिक विभागाचे सहव्यवस्थापकीय ( Mahavitaran) संचालक दिलीप जगदाळे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून मुख्य महाव्यवस्थापक (प्रवसु) अरविंद भादीकर, मुख्य तपास अधिकारी दत्तात्रय बनसोडे, नाट्यस्पर्धेचे निमंत्रक व मुख्य अभियंता सुंदर लटपटे, मुख्य अभियंते हरिष गजबे (चंद्रपूर), चंद्रमणी मिश्रा (कल्याण), संजय पाटील (भांडुप), पवनकुमार कछोट (छत्रपती संभाजीनगर), नाट्यस्पर्धेचे मुख्य समन्वयक व मुख्य औद्योगीक संबंध अधिकारी संजय ढोके यांची उपस्थिती होती. या पाहुण्यांच्या हस्ते नाट्यस्पर्धेतील विजेत्या संघांना करंडक तसेच वैयक्तिक गटातील विजेत्यांना स्मृतीचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. नाट्यस्पर्धेचे परीक्षक म्हणून प्रभाकर दुपारे, चंद्रकांत जाडकर, मीनाक्षी केंढे यांनी काम पाहिले.

सहव्यवस्थापकीय संचालक श्री. दिलीप जगदाळे म्हणाले, महावितरणच्या कामाचे स्वरूप पाहता नाट्यकर्मी कर्मचाऱ्यांना खूप कमी वेळ मिळतो. तरी देखील ( Mahavitaran)अथक परिश्रम घेत नाट्य कलावंतानी अतिशय दर्जेदार कलाकृती सादर केल्या आहेत. महावितरणच्या कर्मचाऱ्यांना नवऊर्जा देणारी ही नाट्यस्पर्धा आहे असे त्यांनी सांगितले. बक्षिस वितरण कार्यक्रमाला महावितरणचे वरिष्ठ अधिकारी, अभियंते, अधिकारी, कर्मचारी व नाट्यरसिक बहुसंख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी विकास आढे व रंगकर्मी संदीप पाचंगे यांनी केले.

Shero-shayari : मनाला आवडलेले शेर – कुछ इस तरहसे मैने जिंदगी को आंसा कर दिया…

या नाट्यस्पर्धेत पुणे प्रादेशिक विभागाने ‘डॉक्टर तुम्ही सुद्धा’, कोकण प्रादेशिक विभागाने ‘आवर्त’, नागपूर प्रादेशिक विभागाने ‘रंगबावरी’ आणि छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक ( Mahavitaran)विभागाने ‘केस नं. ९९‘ नाट्यप्रयोग सादर केले. पारितोषिक वितरण सोहळ्याला राज्यभरातील महावितरणचे वरिष्ठ अधिकारी, अभियंते, अधिकारी, कर्मचारी व नाट्यरसिक बहुसंख्येने उपस्थित होते.

राज्यस्तरीय नाट्यस्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे – ( Mahavitaran)

सर्वोत्कृष्ट नाटक : प्रथम- डॉक्टर, तुम्ही सुद्धा! (पुणे), द्वितीय- रंगबावरी (नागपूर)
दिग्दर्शन : प्रथम – ज्ञानदेव पडळकर (पुणे), द्वितीय – संध्या चिवंडे (नागपूर)
अभिनय (पुरुष) : प्रथम – विजय जोशी (पुणे), द्वितीय – श्रावण कोळनुरकर (छत्रपती संभाजीनगर)
अभिनय (स्त्री) : प्रथम – रोहिणी ठाकरे(नागपूर), द्वितीय – भक्ति जोशी(पुणे)
नेपथ्य : प्रथम – सतीश सरोदे (पुणे), द्वितीय – राम मेस्त्री (कोकण)
प्रकाशयोजना : प्रथम – अभय येरडे (छत्रपती संभाजीनगर), द्वितीय – अभिजीत सिकनिस (कोकण)
संगीत : प्रथम – रुपेश देशमुख(नागपूर), द्वितीय – अनिल राजपूत (छत्रपती संभाजीनगर)
रंगभूषा व वेशभूषा : प्रथम – विकास पुरी (पुणे), द्वितीय – प्रशांत ठाकरे(नागपूर)
उत्तेजनार्थ (अभिनय) : श्रद्धा मुळे (कोकण), सचिन निकम (पुणे), सायली सायनकर (नागपूर) आणि रमेश शिंदे (छत्रपती संभाजीनगर) यांना सन्मानित करण्यात आले.

Follow Us On