Team My Pune City –महावितरणमध्ये विद्युत सहायकपदी निवड झालेल्या(Mahavitaran) उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी दि. २० ते २२ ऑगस्टला पूर्ण झाली आहे. तथापि राज्यातील अतिवृष्टी व पूरपरिस्थिती तसेच इतर कारणांमुळे गैरहजर असलेल्या काही उमेदवारांच्या मूळ कागदपत्रांच्या पडताळणीसाठी दि. ९ व १० सप्टेंबरला शेवटची संधी देण्यात आली आहे.
महावितरणने जाहिरात क्र. ०६/२०२३ अन्वये विद्युत सहायक पदासाठी निवड झालेले उमेदवार व त्यांना वर्ग केलेल्या परिमंडलांची यादी कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केली आहे. या उमेदवारांच्या मूळ कागदपत्रांची व प्रमाणपत्रांची पडताळणी संबंधित परिमंडल कार्यालयांमध्ये दि. २० ते २२ ऑगस्ट दरम्यान करण्यात आली आहे. मात्र या तीनही दिवसांत राज्यात अतिवृष्टी व पूरपरिस्थिती तसेच काही अपरिहार्य कारणांमुळे निवड झालेल्या ज्या उमेदवारांना उपस्थित राहता आले नाही, अशा काही गैरहजर उमेदवारांना मूळ कागदपत्रे व प्रमाणपत्रांच्या पडताळणीसाठी आणखी एक संधी देण्यात आली आहे.
Pimpri-Chinchwad: भक्ती-शक्ती ते चाकण मेट्रो प्रकल्पाला वेग : आमदार शंकर जगताप यांच्या पुढाकाराने गती
Dehugaon: देहूगावातून मराठा आंदोलनासाठी पाच टेम्पो भरून रसद मुंबईकडे रवाना
त्यानुसार आता दि. ९ व १० सप्टेंबरला गैरहजर उमेदवारांच्या ऑनलाइन अर्जामधील नोंदी, अर्हता, कागदपत्रे, प्रमाणपत्रांची छाननी व पडताळणी त्यांना वर्ग केलेल्या संबंधित परिमंडल कार्यालयांमध्ये होणार आहे. सकाळी १० वाजता ही कार्यवाही सुरू होईल. त्यासाठी संबंधित उमेदवारांनी स्वतः सर्व मूळ कागदपत्रे व प्रमाणपत्रांसह हजर राहणे आवश्यक आहे. जे उमेदवार आणखी एक संधी देऊनही कागदपत्रांच्या पडताळणीसाठी हजर राहणार नाही त्यांची निवड रद्द समजली जाईल व भविष्यात त्यांच्याशी कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही असे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
मूळ कागदपत्रे व प्रमाणपत्रांच्या छाननी व पडताळणीमध्ये विद्युत सहायकपदी निवड झालेल्या जे उमेदवार पात्र होतील त्यांच्या नियुक्तीबाबत संबंधित परिमंडलांमध्ये पुढील कार्यवाही करण्यात येईल. याबाबतची माहिती महावितरणच्या www.mahadiscom.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.