Team My Pune City –गेल्या काही दिवसांपासून कोकण किनारपट्टी वर जोरदार पाऊस झाल्यानंतर (Maharashtra Weather News )अखेर आज हवामान शांत झाले आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर, रायगड आणि रत्नागिरी , पुणे या जिल्ह्यांसह संपूर्ण महाराष्ट्रात हवामान स्थिर आहे. हवामान खात्याने सध्या पावसाचा कोणत्याही जिल्ह्यासाठी इशारा दिलेला नाही.
आज मुंबईतील हवामान अंशतः ढगाळ राहीले. आर्द्रतेमुळे थोडी उष्णता निर्माण होईल. ठाणे आणि नवी मुंबई भागात गेल्या काही दिवसांपासून अधूनमधून मुसळधार पाऊस पडत होता, परंतु आता पावसाने हार मानली आहे. आज या भागात आकाश अंशतः ढगाळ राहील. पालघर जिल्ह्यातील हवामानही आज स्थिर आहे आणि ग्रामीण भागात सकाळपासून ढगाळ हवामान आहे.
School Education Department: राज्यातील कन्याशाळांचे सहशिक्षणात रूपांतर करण्याचा शालेय शिक्षण विभागाचा निर्णय
Pune Rural Police : पुणे ग्रामीण पोलीस दलात 14 अधिकाऱ्यांच्या बदल्या, वडगाव मावळ व कामशेतचे नवीन पीआय नियुक्त
रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तिन्ही किनारी जिल्ह्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून अधूनमधून पाऊस पडत आहे. तथापि, आज हवामान शांत आहे.महाराष्ट्रात कुठेही मुसळधार पावसाचा इशारा नाही. काही ठिकाणी हलका पाऊस पडेल.