Team My Pune City – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये ( Maharashtra Board) होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर केले आहे. मंडळाचे सचिव डॉ. दीपक माळी यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिलेल्या माहितीनुसार, या परीक्षा राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत आयोजित करण्यात येणार आहेत. बारावीची लेखी परीक्षा १० फेब्रुवारी ते १८ मार्च या कालावधीत होणार असून प्रात्यक्षिक, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा २३ जानेवारी ते ९ फेब्रुवारी दरम्यान घेण्यात येतील.
Rashi Bhavishya 1 November 2025 – कसा जाईल आपला आजचा दिवस?
दहावीची लेखी परीक्षा २० फेब्रुवारी ते १८ मार्च या कालावधीत होणार असून प्रात्यक्षिक, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा २ ते १८ फेब्रुवारीदरम्यान पार पडतील. या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक यापूर्वी १३ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध झाले होते, मात्र आता अंतिम वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. सविस्तर दिनांकनिहाय वेळापत्रक मंडळाच्या संकेतस्थळावर www.mahahsscboard.in येथे ३१ ऑक्टोबरपासून उपलब्ध( Maharashtra Board) आहे.
Pimpri Firefighter Death:व्यायाम करताना अग्निशमन जवानाचा मृत्यू | पिंपरी-चिंचवड
तथापि, अंतिम मान्य वेळापत्रक हे शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना देण्यात येणाऱ्या छापील प्रतीतूनच ग्राह्य धरावे, असे मंडळाने स्पष्ट केले आहे. इतर संकेतस्थळे, समाजमाध्यमे किंवा खासगी यंत्रणांकडून प्रसारित वेळापत्रकांवर विश्वास ठेवल्यास विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्यास मंडळ जबाबदार राहणार नाही, असा इशाराही देण्यात आला ( Maharashtra Board) आहे.






















