Team MyPuneCity – रस्त्याने पायी जात असलेल्या कामगारांना अडवून त्यांच्या खिशातून जबरदस्तीने पैसे काढून घेतल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 13 मे रोजी पहाटे भांबोली येथे ( Mahalunge Crime News) घडली.
याप्रकरणी आनंदकुमार दीपककुमार स्वाईन (19, भांबोली) यांनी 8 जून रोजी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार यश संतोष लोंढे, पंकेश दत्तात्रय जाधव, सुरज कांबळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आनंदकुमार हे त्यांच्या तीन मित्रांसोबत पायी चालत जात होते. त्यावेळी त्यांना रस्त्यात अडवून आरोपींनी मारहाण केली. आनंदकुमार यांच्या मित्राच्या खिशातून पाचशे रुपये जबरदस्तीने काढून घेतले तसेच फिर्यादी यांच्या फोन पे ॲप वरून आरोपी पंकेश जाधव याच्या खात्यावर एक हजार रुपये जबरदस्तीने ट्रान्सफर करून घेत जीवे मारण्याची( Mahalunge Crime News) धमकी दिली.