Team Pune City –श्रावण महादेवाची भक्ती करण्याचा पवित्र महिना तसे तर आपण १२ हि महिने देवाची भक्ती करतो पण या महिन्यास विशेष महत्व प्राप्त झालेले आहे. अशा या श्रावणात आपण १२ ज्योतिर्लिंगाची माहिती पाहणार आहोत.उज्जैनीचे श्री महाकालेश्वर हे बारा प्रसिद्ध ज्योतिर्लिंगांपैकी तिसरे ज्योतिर्लिंग आहे .मध्यप्रदेशातील क्षिप्रा नदीच्या काठी उज्जैन येथे श्री महाकालेश्वर ज्योतिर्लिंग एकमेव दक्षिणमुखी शिवलिंग आहे जे स्वयंभू आहे.
अनेक जण या महाकालेश्वराचे दर्शन घेण्यासाठी फार दुरून येतात. (Mahakaleshwar Mahadev)महाकाल म्हणजे काळाचा स्वामी, जो मृत्यू आणि वेळेवर नियंत्रण ठेवतो. महाकाल हे शिवाचे एक उग्र आणि शक्तिशाली रूप आहे.
Somnath Mahadev: कथा पहिल्या ज्योतिर्लिंगाची,सोमनाथ महादेवाची
कसे स्थापन झाले ज्योतिर्लिंग
चंद्रसेन नावाचा एक राजा होता. तो महादेवाचं खूप मोठा भक्त होता. त्याची संपूर्ण प्रजा ही देखील शिवाची खूप मोठे भक्त होते. त्यामुळे या राज्यात शिवाचा वास होता. एकदा चंद्रसेन राजाच्या राज्याशेजारी असलेल्या राजाने चंद्रसेनच्या राज्यावर आक्रमण केले होते . याच वेळी दूषण नावाच्या राजाने देखील या राज्यावर आक्रमण केले. त्यामुळे सारे राज्य उद्धवस्त झाले. राक्षसाच्या उत्पादाने कंटाळलेल्या शिवभक्तांनी त्यावेळी महादेवाला वाचवण्याचे आवाहन केले. त्यानुसार आपल्या प्रिय भक्तांना वाचवण्यासाठी शिव धरा फाडून त्या राक्षसाचा वध करण्यासाठी प्रकट झाले होते. त्यावेळी महादेवांनी महाकालाचे रुप धारण केले होते. त्यांनी त्या राक्षसाचा वध केला आणि जनतेचा त्याच्या जाचातून मुक्त केले. तेथील लोकांची भक्ति पाहून महाकाल तिथेच विराजित झाले.
महाकाल उज्जैन येथील भस्मारती ही खूपच प्रसिद्ध आहे. यावेळी महाकालाला भस्म लावून शृंगार केला जातो. तेथे होणारी आरती अंगावर काटा आणणारी असते.