Team My Pune City –महादेवाची पूजा करण्याचा पवित्र महिना श्रावण. (Mahadev Puja Rituals)या महिन्यात देवाधिदेव महादेवाची पूजा कारण शुभ मानले जाते तसे आपण १२ महिनेही पूजा करू शकतो. पण श्रवणास विशेष महत्व आहे. श्रावण महिना महादेवाच्या उपासनेसाठी सर्वोत्तम काळ मानला जातो.
या पवित्र महिन्याची सर्व शिव भक्त आतुरतेने वाट पाहत असतात. देवशयनी एकादशीपासून भगवान विष्णू योगनिद्रेत जातात. त्यामुळे सृष्टीच्या संचलनाची जबाबदारी भगवान शिवावर येते. या काळात भगवान शिवाच्या आराधनेला विशेष महत्त्व आहे. शिवा चा आशीर्वाद घेण्यासाठी शिव भक्त श्रावण महिनाभर त्यांचे पूजन, जप, उपवास करत असतात. प्रत्येक शिव भक्त हे त्यांच्या परीने पूजा करत असतात. शिवाला साम्बसदाशिव ,तसेच भोळा शंकर असेही म्हणतात. आपल्या भक्ताने भक्ती भावाने केलेली कशीही पूजा ते स्वीकारतात.
शिव पूजा कशी करावी
भगवान शिवाला प्रिय असलेल्या श्रावण महिन्यात, दरसोमवारी स्नान करून पूजेची तयारी करा. एक तांब्या पाणी घ्या. पंचामृत अथवा दूध घ्या. कापसाचे वस्त्र बनवा ,हळदी कुंकू ,कपूर ,धूप , तेल दिवा ,तूप दिवा , भस्म , धतोरा ,फूल ,हार ,बेल , गंगाजला, कमलगट्ठा , चंदन ,प्रसाद , इ.
घरी किव्वा मंदिरात शिवपिंडीवर प्रथम थोडे पाणी टाकावे ,त्यानंतर पंचामृत ( दूध, दही, मध, तूप , साखर) अथवा दूध टाकून परत पाणी टाकावे. असे म्हणतात तांब्याच्या भांड्यातून जल अर्पण केल्याने विशेष फायदा मिळतो. त्यानंतर भस्म लावावा , त्यानंतर ,हळदी कुंकू ,चंदन लावावे. त्यानंतर महादेवाला प्रिय असलेले शमी आणि बेलपत्र अर्पण करा. ही दोन्ही पानं नेहमी देठ तोडून उलटे अर्पण करावीत. धतोरा , हार फुल वाहावे. दिवे लावावीत. शिवाची आरती करावी. प्रसाद करावा. यादिवशी नामस्मरण आणि जमल्यास उपवास करावा. श्रावण महिन्यात महादेवासह पार्वती, गणपती, कार्तिकेय , अशोकसुंदरी आणि नाग देवता यांची देखील अवश्य पूजा करावी.

भगवान शंकराच्या आरत्या
|| गणपतीची आरती ॥
सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची। नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची। सर्वांगी सुंदर उटि शेंदुराची। कंठीं झळके माळ मुक्ताफळांची । जयदेव जयदेव जय मंगलमूर्ती । दर्शनमात्रे मनः कामना पुरती ।
रत्नखचित फरा तुज गौरीकुमरा। चंदनाची उटी कुंकुमकेशरा। हिरेजडित मुगुट शोभतो बरा। रुणझुणती नुपुरें चरणी घागरिया ॥ जय. ।२ ।
लंबोदर पीतांबर फणिवरबंधना । सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना । दास रामाचा वाट पाहे सदना । संकटी पावावें, निर्वाणीं रक्षावें सुरवरवंदना । जयदेव जयदेव जय मंगलमूर्ती । दर्शन. । ३ ।
——-
लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा ।
वीषें कंठ काळा त्रिनेत्रीं ज्वाळा ॥
लावण्यसुंदर मस्तकीं बाळा ।
तेथुनियां जल निर्मळ वाहे झुळझूळां ॥ १ ॥
जय देव जय देव जय श्रीशंकरा ।
आरती ओवाळूं तुज कर्पूरगौरा ॥ ध्रु० ॥
कर्पूरगौरा भोळा नयनीं विशाळा ।
अर्धांगीं पार्वती सुमनांच्या माळा ॥
विभुतीचें उधळण शितिकंठ नीळा ।
ऐसा शंकर शोभे उमावेल्हाळा ॥ जय देव० ॥ २ ॥
देवीं दैत्य सागरमंथन पै केलें ।
त्यामाजीं जें अवचित हळाहळ उठिलें ॥
तें त्वां असुरपणें प्राशन केलें ।
नीळकंठ नाम प्रसिद्ध झालें ॥ जय देव० ॥ ३ ॥
व्याघ्रांबर फणिवरधर सुंदर मदनारी ।
पंचानन मनमोहन मुनिजनसुखकारी ॥
शतकोटीचें बीज वाचे उच्चारी ।
रघुकुळटिळक रामदासा अंतरीं ॥ जय देव जय देव० ॥ ४ ॥
आरती भीमाशंकर ज्योतोर्लिंग परात्पर ।ओवाळीतो कर्पूर शिवगौर भीमाशंकरा ।
भक्ता सोडुनी बहू दूर ।
मंदिर तुझे दरीखोर ।
सत्व पाहाशी खरोखर ।
भीमाशंकरा कर्पूर शिवगौरा
भीमा निघुनी तुझे चरणी ।
पावन करीसी सर्व धरणी ।
करणी आहे तुझी न्यारी ।
भीमाशंकरा कर्पूर शिवगौरा
गगना भेदी तुझे शिखर ।
पाहता पाप ताप हर ।
सन्मुख उभा नंदीश्वर ।
भीमाशंकरा कर्पूर शिवगौरा
एक आरती तुझ राया ।
शोक नाशक शिवराय ।
भाकीती शंभू गौरीवरा
भीमाशंकरा कर्पूर शिवगौरा
पंचारती करितो राय ।
पंचमुखी शंभूराया ।
पंच तत्व निर्विकारा ।
भीमाशंकरा कर्पूर शिवगौरा
भू कैलास खरोखर।
कमळजा देवी अवतार ।
करितो प्रभू नमस्कार
————
भीमाशंकरा कर्पूर शिवगौरा
ॐ जय शिव ओंकारा की आरती
ओम जय शिव ओंकारा, स्वामी जय शिव ओंकारा।
ब्रह्मा, विष्णु, सदाशिव, अर्द्धांगी धारा॥ ओम जय शिव ओंकारा॥
एकानन चतुरानन पञ्चानन राजे।
हंसासन गरूड़ासन वृषवाहन साजे॥ ओम जय शिव ओंकारा॥
दो भुज चार चतुर्भुज दसभुज अति सोहे।
त्रिगुण रूप निरखत त्रिभुवन जन मोहे॥ ओम जय शिव ओंकारा॥
अक्षमाला वनमाला मुण्डमालाधारी।
त्रिपुरारी कंसारी कर माला धारी॥ ओम जय शिव ओंकारा॥
श्वेताम्बर पीताम्बर बाघंबर अंगे।
सनकादिक गरुड़ादिक भूतादिक संगे॥ ओम जय शिव ओंकारा॥
कर के मध्य कमण्डल चक्र त्रिशूलधारी।
जगकर्ता जगभर्ता जगसंहारकर्ता॥ ओम जय शिव ओंकारा॥
ब्रह्मा विष्णु सदाशिव जानत अविवेका।
प्रणवाक्षर के मध्ये ये तीनों एका॥ ओम जय शिव ओंकारा॥
काशी में विराजे विश्वनाथ, नन्दी ब्रह्मचारी।
नित उठ दर्शन पावत, महिमा अति भारी॥ ओम जय शिव ओंकारा॥
त्रिगुणस्वामी जी की आरति जो कोइ नर गावे।
कहत शिवानन्द स्वामी, मनवान्छित फल पावे॥
ओम जय शिव ओंकारा॥ स्वामी ओम जय शिव ओंकारा॥
जय देव जय देव जय मंगेशा ।
आरती ओवाळूं तुजला सर्वेशा ।
महास्थान तुझे गोमांतक प्रांती ।
भावेकरुनी करितां तुजला आरती ।।
महाभक्त तुझे निशिदिनिं गुण गाती ।
मी तो दास तुझ्या चरणांची माती ॥ जय. ।
धरिलासी अवतार दुष्टां माराया ।
साधूसंत जन पृथ्वी ताराया ॥
भक्तांचा तारक तूं मंगेशराया ।
सर्प अक्षय करितो तुजवरती छाया ॥ जय. ।
दु:खदारिद्रादिक ही विघ्नें निवारी ।
संकष्टापासूनी मजलागीं तारीं ॥
शक्ती घेऊनि करीं दृष्टां संहारी ।
जैसा धेनू रक्षी कृष्ण नरकारी ॥ जय. ॥
तत्व गुणवर्णन करितां पुण्याचे चेव ।