मावळ ऑनलाईन – सांगुर्डी गावचे शेतकरी कुटुंबातील,वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ मार्गदर्शक व पिंपरी चिंचवड महानगर पालिकेचे सेवानिवृत्त प्रशासन अधिकारी महादेव रामभाऊ भसे (Mahadev Bhase वय ७२ वर्षे) यांचे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले.
महादेव भसे यांचे मागे पत्नी,दोन मुले,मुलगी,भाऊ,तीन बहिणी, पुतणे,सूना,नातवंडे असा परिवार आहे.
कै.महादेव भसे (Mahadev Bhase) यांचे निधनाने सांगुर्डी गावचा एक मार्गदर्शक,गावचे भूषण तसेच चालते बोलते वैभव हरपले असल्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
प्रगतीशील शेतकरी गणेश भसे, अभियंता स्वप्नील भसे व प्रा अर्चना येवले यांचे वडील तर अमरदेवी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष अशोकआप्पा शेलार यांचे जावई व नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे सहसचिव नंदकुमार शेलार यांचे ते मेव्हणे होत.




















