Team My pune city – महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ कामगार कल्याण केंद्र ( L’Oreal India) चाकण लॉरियाल इंडिया एम्प्लॉईज युनियन आणि लॉरियाल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने लॉरियाल इंडिया एम्प्लॉइज युनियनच्या १४ व्या वर्धापन दिनानिमित्त भव्य असे रक्तदान शिबिर दिनांक ०२ ऑगस्ट २०२५ रोजी मोठ्या उत्सवात पार पडले. कंपनी आवारातील संघटना सभासद त्याचप्रमाणे कंत्राटी कर्मचारी आणि व्यवस्थापन वर्ग यांनी देखील उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देऊन आपली समाजाप्रती असलेली बांधिलकी जपत रक्तदान केले.
Pistols seized : कोंढवे धावडे व दत्तवाडी येथील सराईतांकडून दोन पिस्तुले जप्त
जवळपास २७० जणांनी रक्तदान करण्यासाठी पुढाकार घेतला परंतु हिमोग्लोबीन आणि इतर काही आरोग्यविषयक कारणास्तव रिजेक्ट झालेले इच्छुक सोडून एकूण १८० रक्तदात्यांनी प्रत्यक्ष रक्तदान केले.
सदर कार्यक्रमास रविराज इळवे , दत्तात्रय येळवंडे ,सुजाता रविराज इळवे , मनोज पाटील ,अमित गर्ग , संतोष कदम , वेंडेल वेस्ली , संजय थोरात , अविनाश वाडेकर, , गणेश बोचरे, रवी साबळे, नीलेश पाटोळे, कमलेश गावडे ,रूपाली शिंदे, मुकुंद म्हाळुंगकर, श्रद्धा सरकार, अंकुश ताठे, किशोर दाभाडे, गणेश आरुडे आणि सर्व संघटना सभासद उपस्थित (L’Oreal India)होते.
Fraud : शेअर ट्रेडिंगच्या बहाण्याने साडेनऊ लाखांची फसवणूक
सदर प्रसंगी संघटनेचे अध्यक्ष यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले. कल्याण आयुक्त माननीय श्री रविराज इळवे साहेब यांनी कार्यक्रम आयोजकांचे अभिनंदन केले आणि लॉरियाल व्यवस्थापन आणि संघटना यांच्यामधील नातेसंबंधांचे कौतुक केले तसेच महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या विविध योजनाची माहिती दिली. तद्नंतर मा. इळवे साहेब, कल्याण आयुक्त मा.वेस्ली एच आर यांच्याहस्ते कंपनी आवारामध्ये वृक्षारोपण करण्यात आले.
Pistols seized : कोंढवे धावडे व दत्तवाडी येथील सराईतांकडून दोन पिस्तुले जप्त
कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रत्येक रक्तदाता आणि त्याच्या कुटुंबातील दोन प्रौढ व्यक्ती यांचा प्रत्येकी पाच लाख याप्रमाणे एकूण पंधरा लाखांचा अपघाता विमा काढण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अविनाश राऊत या़ंनी केले . हे रक्तदान शिबिर यशस्वी होण्याकरिता लॉरियाल इंडिया एम्प्लॉइज युनियन प्रतिनिधी, एच आर प्रतिनिधी व व्यवस्थापन वर्ग यांनी परिश्रम घेतले. संघटनेच्यावतीने रवी साबळे यांनी सर्वांचे आभार व्यक्त करण्यात ( L’Oreal India) आले.