situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Lonavala: कैवल्यधाम, लोणावळा येथे ‘योग उत्सव २०२५’ उत्साहात पार; निरोगी जीवनासाठी योगाभ्यासाचा संदेश

Published On:

Team MyPuneCity –“योगः कर्मसु कौशलम्” या भगवद्गीतेतील सूक्त वाक्याचा अर्थ प्रत्यक्ष अनुभवण्याचा योग साधणारा एक प्रेरणादायी योग प्रशिक्षण शिबिर आज लोणावळ्यातील कैवल्यधाम संस्थेच्या परिसरात संपन्न झाला. आयुष मंत्रालयाच्या वतीने ‘इंटरनॅशनल डे ऑफ योगा – २०२५’ (International Day of Yoga 2025) निमित्त आयोजित करण्यात आलेल्या या विशेष ‘योग उत्सव २०२५’ कार्यक्रमात शारीरिक व मानसिक आरोग्य संवर्धनासाठी योगाभ्यासाचे महत्व अधोरेखित करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक पद्धतीने करण्यात आली. विविध योगासनांचे सादरीकरण, श्वसन तंत्र (प्राणायाम), ध्यान व योगशास्त्रावरील मार्गदर्शन सत्रांमधून सहभागी नागरिकांना योगाच्या सखोल अभ्यासाचा अनुभव घेता आला. प्रशिक्षकांनी योगाभ्यासाचे शास्त्रशुद्ध फायदे, नियमित सरावाचे लाभ तसेच मनःशांती व कार्यक्षमतेवरील परिणाम स्पष्टपणे मांडले.

Pune Crime News 17 May 2025 : सिटिझन ट्रेडिंग बँकेजवळ इसमाच्या मोबाईलची जबरी चोरी

कार्यक्रमात कैवल्यधामचे मुख्याधिकारी सुबोध तिवारी, खासदार श्रीरंग बारणे, पोलीस उपनिरीक्षक सुभाष डले, इन्स्टिट्यूट ऑफ मरीन टाइमचे कॅप्टन सुब्रोतो खान, पोलीस ट्रेनिंग सेंटर आर.टी.पी.सी. खंडाळा येथील प्रशिक्षणार्थी विद्यार्थी, तसेच INS शिवाजी, लोणावळा येथील विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. योगाच्या तत्त्वज्ञानाशी एकरूप होत सर्व सहभागी उत्साहात व एकाग्रतेने योगासने करत होते.

या शिबिरात योग हे केवळ शारीरिक व्यायाम नसून एक जीवनपद्धती आहे, यावर भर देण्यात आला. मन व शरीर यांचे समन्वय साधण्यासोबतच सकारात्मकता, एकाग्रता आणि तणावमुक्त जीवनासाठी योगशास्त्राचा उपयोग कसा करावा, हे मार्गदर्शकांनी उदाहरणांसह सांगितले.

कार्यक्रमानंतर उपस्थितांनी आपले अनुभव शेअर करत योगाच्या माध्यमातून मिळालेल्या सकारात्मक ऊर्जेचे कौतुक केले. आयुष मंत्रालयाच्या पुढाकाराने आणि कैवल्यधामच्या सहकार्याने पार पडलेला हा योगउत्सव २०२५ योगप्रेमींसाठी एक प्रेरणास्त्रोत ठरला.

कार्यक्रमानंतर उपस्थितांनी आपले अनुभव शेअर करत योगाच्या माध्यमातून मिळालेल्या सकारात्मक ऊर्जेचे कौतुक केले. आयुष मंत्रालयाच्या पुढाकाराने आणि कैवल्यधामच्या सहकार्याने पार पडलेला हा योगउत्सव २०२५ योगप्रेमींसाठी एक प्रेरणास्त्रोत ठरला.

Follow Us On