Team MyPuneCity – लोणावळ्यात ऑनलाइन जुगाराच्या नशेत एका तरुणाने मोठी चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार (Lonavala Rural Police) समोर आला आहे. या तरुणाने तब्बल ८.७८ लाख रुपयांची चोरी करून ती रक्कम जुगारासाठी वापरली. ९ मार्च रोजी ही घटना घडली असून, पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपीचा शोध घेत त्याला अटक केली आहे. लातूर जिल्ह्यातील बाभळगाव शेलू येथे लपून बसलेल्या या आरोपीला पुणे ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे.
अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव सचिन मोहन बोयणे (वय ३२, रा. वराळे फाटा, तळेगाव दाभाडे, मूळ गाव बाभळगाव शेलू, जिल्हा लातूर) असे आहे. ९ मार्च रोजी लोणावळ्यातील कुसगाव येथे असलेल्या धनश्री सुपर मार्केटमध्ये चोरी झाल्याची घटना उघडकीस आली. घटनेनंतर लोणावळा ग्रामीण पोलिसांनी (Lonavala Rural Police) तक्रार दाखल करून तपास सुरू केला.
तांत्रिक विश्लेषणाद्वारे आरोपी लातूर जिल्ह्यात असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पुणे ग्रामीण पोलिसांच्या पथकाने तिथे जाऊन त्याला ताब्यात घेतले. चौकशीत आरोपीने चोरी केल्याची कबुली दिली असून, त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे.
या कारवाईसाठी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर आणि लोणावळा ग्रामीणचे (Lonavala Rural Police) वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने कार्य केले.
River development project: पिंपळे सौदागर येथे मानवी साखळी करत नागरिकांचा नदी विकास प्रकल्पाला विरोध
पोलीस उपनिरीक्षक अभिजीत सावंत, पोलीस हवालदार प्रकाश वाघमारे, राहुल पवार, राजू मोमिन, अतुल डेरे, मंगेश थिगळे तसेच पोलीस कॉन्स्टेबल सागर नामदास, तुषार भोईटे, मंगेश भगत, विजय गाळे आणि पोलीस नाईक सतीश कुदळे यांच्या सहकार्याने आरोपीला पकडण्यात यश आले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रकाश वाघमारे करत आहेत.