Team MyPuneCity – लोणावळा शहर पोलीस ठाण्याच्या समोर असलेल्या पैठणी या दुकानात चोरी झाली. दुकानातून रोख रक्कम आणि सोन्याचे (Lonavala Crime News) दागिने चोरीला गेले आहेत. ही घटना बुधवारी (२८ मे) सकाळी उघडकीस आली आहे.
लोणावळा शहर पोलीस ठाण्यासमोर हाकेच्या अंतरावर पैठणी नावाचे कापडाचे दुकान आहे. या दुकानात मंगळवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी चोरी केली. दुकानातून रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने चोरून नेले आहेत. याप्रकरणी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
Pimpri : युवा पिढीने स्वातंत्र्यवीर सावरकरांचे कार्य पुढे नेणे गरजेचे – शत्रुघ्न काटे
लोणावळा शहरातील ठोंबरेवाडी येथील मंदिरातील दानपेटी चोरीला
लोणावळा शहरातील ठोंबरेवाडी मधील हनुमान मंदिरात चोरीची घटना घडली. चोरट्यांनी मंदिरातून दानपेटी चोरून नेली आहे. ही घटना सोमवारी (२६ मे) पहाटे तीन वाजताच्या सुमारास घडली.
याप्रकरणी युवराज रामदास देशमुख (२३, रा. ठोंबरेवाडी, लोणावळा) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हनुमान मंदिरातून दानपेटी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. त्यामध्ये सुमारे सात हजार रुपये रोख रक्कम (Lonavala Crime News) होती.