Team MyPuneCity – तुंगार्ली लोणावळा येथील श्री शत्रूंजय आदिनाथ जैन श्वेतांबर जिनालय येथे चोरीची घटना रविवारी (१ जून) सकाळी उघडकीस आली. तीन चोरट्यांनी जिनालयातून ९३ हजार रुपये रोख रक्कम चोरून नेले (Lonavala Crime News) आहेत.
नितीन सुखदेव येवले (४२, नांगरगाव लोणावळा) यांनी याप्रकरणी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तीन अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Pimpri Chichwad Crime News 02 June 2025 : ट्रेलरने धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी येवले हे तुंगार्ली लोणावळा येथील श्री शत्रूंजय आदिनाथ जैन श्वेतांबर जिनालाय येथे मॅनेजर आहेत. रात्रीच्या वेळी जिनालयाच्या भिंतीची लोखंडी जाळी तोडून तीन चोरट्यांनी आत प्रवेश केला. जिनालयातून ७० हजार रुपये रोख रक्कम आणि पुजारी ललित राऊळ यांच्या कपाटातून २३ हजार रुपये रोख रक्कम चोरटयांनी चोरून नेली (Lonavala Crime News) आहे.