Team MyPuneCity – लोणावळा शहरातील डॉ. हिरालाल खंडेलवाल यांच्या (Lonavala Crime News) घरावर सोमवारी (२६ मे) दरोडा पडला. डॉ. खंडेलवाल आणि त्यांच्या पत्नीचे हातपाय बांधून त्यांच्या तोंडात कापड कोंबून त्यांना शस्त्राचा धाक दाखवण्यात आला. दरोडेखोरांनी घरातून सोन्या-चांदीचे, डायमंडचे दागिने, रोख रक्कम असा एकूण ११ लाख ५० हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. ही घटना मंगळवारी (२७ मे) पहाटे तीन वाजताच्या सुमारास घडली.
Pune : झगमगाटामागील तपश्चर्येचे विस्मरण होऊ नये – प्रकाश जावडेकर
तरुण चंद्रमोहन खंडेलवाल (५८, लोणावळा) यांनी याप्रकरणी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार २२ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुण खंडेलवाल यांचे चुलते डॉ. हिरालाल खंडेलवाल यांचा खंडेगेवाडी लोणावळा येथे ओम श्री बंगला आहे. त्यांच्या बंगल्याचा सुरक्षा रक्षक अंबादास रायबोने आणि वर्षा रायबोने हे बंगल्याच्या पोर्चमध्ये झोपले होते. सुमारे २२ दरोडेखोरांनी शस्त्रासह बंगल्यात येऊन सुरुवातीला रायबोने दाम्पत्याचे कपड्याने हातपाय बांधले आणि तोंडात कापड कोंबले.
त्यानंतर डॉ. हिरालाल खंडेलवाल आणि त्यांच्या पत्नी विजया खंडेलवाल झोपलेल्या बेडरूमचा दरवाजा दरोडेखोरांनी तोडला. खंडेलवाल दाम्पत्याचे देखील हातपाय बांधून त्यांच्या तोंडात कापड कोंबून शस्त्राचा धाक दाखवला. घरातून ११ लाख ५० हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदी, डायमंडचे दागिने, रोख रक्कम चोरून (Lonavala Crime News) नेली.