Team My pune city – लोकजनशक्ती पार्टी रामविलासतर्फे पुण्यातील साधू वासवानी चौक येथील आयकर विभागाच्या कार्यालयासमोर आज सकाळी अकरा वाजता धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलनात टाळ्या, थाळ्या ( Lok Janshakti Party ) तसेच देशी वाद्यांच्या आवाजात प्रशासनाच्या दिरंगाईचा निषेध व्यक्त करण्यात आला.
हे आंदोलन इन्कम टॅक्स इनफॉर्मेंट्स रिवॉर्ड स्कीम २०१८ अंतर्गत इन्फॉर्मंट कोड मिळविण्यासाठी दाखल केलेल्या मागणीकडे प्रशासनाकडून होणाऱ्या दुर्लक्षाविरोधात होते. पक्षाच्या पुणे शहर-जिल्हाध्यक्ष संजय अल्हाट यांनी सांगितले की, “आम्ही आयकर चुकवणाऱ्या व्यक्ती आणि कंपन्यांविषयी विश्वसनीय माहिती प्रशासनाला वेळोवेळी दिली. मात्र त्यावर कोणतीही ठोस कारवाई ( Lok Janshakti Party ) झाली नाही. त्यामुळे आम्ही आंदोलनाचा मार्ग स्वीकारला.”
Maval: शॉर्टसर्कीटच्या आगीत दोघे गंभीर भाजले, उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू
यावेळी सहायक निवृत्त पोलीस आयुक्त मिलिंद गायकवाड,के.सी.पवार,अमर पुणेकर,कल्पना जावळे,नारायण भिसे,रणजित सोनावळे,राहुल उभे उपस्थित होते.त्यांनी स्पष्ट केले की हे आंदोलन सरकारविरोधी नसून कामचुकार आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांविरोधात आहे. “ही लढाई देशाच्या हितासाठी आहे,” असेही त्यांनी नमूद ( Lok Janshakti Party ) केले.
पक्षाच्या म्हणण्यानुसार, प्रधान मुख्य आयकर आयुक्त कार्यालयातील अधिकारी मोहित जैन, पीयूषकुमार सिंह यादव, संदीप प्रधान आणि आनंद उपाध्याय यांच्याकडे तक्रारी असूनही त्यांनी कोणतीही कृती केली नाही. त्यामुळे त्यांच्या निष्क्रिय आणि भ्रष्ट वर्तनाविरोधात केंद्र सरकारने कारवाई करावी, अशी जोरदार मागणी पक्षाने केली ( Lok Janshakti Party ) आहे.
२०१८ पासून आजतागायत किती इन्फॉरमेन्ट कोड निर्गमित केले,आता कार्यरत अधिकाऱ्यांनी किती कोड निर्गमित केले,या कोडद्वारे किती आयकर जमा केला,या मुद्द्यांवर पक्षाने लेखी माहिती विचारली असता ती देण्यात आली नाही.यात भ्रष्टाचार असल्याने ही माहिती टाळण्यात आली.
इन्कम टॅक्स इन्फॉरमेन्टस रिवॉर्ड स्कीम २०१८ ची अंमलबजावणी केली जावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.या आंदोलनामुळे आयकर विभागाच्या प्रशासनातील कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, या प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणी नागरिकांकडूनही होत ( Lok Janshakti Party ) आहे.