Team My Pune City- गणेशोत्सव काळात पुणे शहराच्या मध्यवस्तीतील (Liquor sale) मद्य विक्री दुकाने सलग दहा दिवस बंद ठेवण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी स्थगिती दिली आहे. या निर्णयानंतर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सुधारित आदेश काढत गणेशोत्सवातील ठराविक दिवशीच मद्यविक्री बंद राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
Indira Atre Award : बालसाहित्यात वैज्ञानिक मांडणीला अधिक महत्त्व – डॉ. सदानंद मोरे
याआधी खडक, विश्रामबाग आणि फरासखाना पोलिस ठाण्यांच्या (Liquor sale) हद्दीतील सर्व मद्य विक्री दुकाने — बार, रेस्टॉरंट व वाइन शॉप्स — २७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर या संपूर्ण कालावधीत बंद ठेवण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिला होता. या निर्णयाला बार अँड रेस्टॉरंट चालक संघटना व मद्य विक्रेत्यांनी तीव्र विरोध दर्शवत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर सुनावणी करत न्यायालयाने संपूर्ण दहा दिवसांची बंदी फेटाळून लावली.
Indira Atre Award : बालसाहित्यात वैज्ञानिक मांडणीला अधिक महत्त्व – डॉ. सदानंद मोरे
गणेशोत्सव काळात पुण्यातील मध्यवस्तीमध्ये मोठ्या संख्येने भाविक दाखल होतात. यामध्ये परगाव व परराज्यातून येणाऱ्यांची संख्या मोठी असते. गर्दीच्या पार्श्वभूमीवर वाद, भांडण किंवा गैरप्रकार टाळण्यासाठी मागील वर्षी पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांच्या प्रस्तावानुसार दहा दिवसांची मद्यबंदी अंमलात आणण्यात आली होती. यंदाही त्याच धर्तीवर निर्णय घेण्यात आला होता. मात्र, त्याला विक्रेत्यांकडून आक्षेप घेण्यात आला आणि अखेरीस न्यायालयाने हस्तक्षेप केला.
सुधारित आदेश काय म्हणतो?
गणेश चतुर्थी (२७ ऑगस्ट) आणि अनंत चतुर्दशी (६ सप्टेंबर) या दिवशी संपूर्ण जिल्ह्यातील (Liquor sale) सर्व मद्य विक्री दुकाने बंद (ड्राय डे) राहतील.
७ सप्टेंबर रोजी पुणे महापालिका क्षेत्रातील विसर्जन मिरवणूक पूर्ण होईपर्यंत मिरवणुकीच्या मार्गावरील सर्व मद्य दुकाने बंद राहतील.
पाचव्या व सातव्या दिवशी जेथे विसर्जन सोहळे होतात, त्या मार्गावरील दुकाने मिरवणुकीदरम्यानच बंद राहतील.
याशिवाय गौरी आगमन (३१ ऑगस्ट) व गौरी विसर्जन (२ सप्टेंबर) या दिवशी मध्यवस्तीतील दुकाने बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.
संपूर्ण दहा दिवसांची मद्यबंदी (Liquor sale) टळल्याने विक्रेत्यांनी दिलासा व्यक्त केला आहे; तर दुसरीकडे पोलिस प्रशासन व जिल्हा प्रशासनाने उत्सवाच्या काळात शिस्त व कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी नागरिकांना सहकार्याचे आवाहन केले आहे.