३० वर्षांच्या यशास्वी वाटचालींची स्मरणिका प्रकाशन
Team My Pune City ( डॉ. रिता शेटीया) – लिला पुनावाला फाउंडेशन (एलपीएफ) शिक्षणाच्या ( Leela Poonawalla Foundation)माध्यमातून मुलींच्या सक्षमीकरणासाठी कार्यरत असलेली सामाजिक संस्था हिने आपल्या कार्याचा ३० वर्षांचा अभिमानास्पद टप्पा गाठला आहे. या निमित्ताने ३० वा पदव्युत्तर शिष्यवृत्ती वितरण सोहळा रविवार, ५ ऑक्टोबर २०२५ रोजी देवांग मेहता ऑडिटोरियम, पर्सिस्टंट सिस्टिम्स, पुणे येथे उत्साहात पार पडला.
या ऐतिहासिक सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे माजी आयपीएस अधिकारी आणि पुदुचेरीच्या माजी राज्यपाल डॉ. किरण बेदी यांची प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थिती. विशेष म्हणजे, त्या १९९६ मध्ये एलपीएफच्या पहिल्याच पुरस्कार सोहळ्याच्या मुख्य पाहुण्या होत्या. तब्बल ३० वर्षांनंतर त्यांनी पुन्हा त्या मंचावर येऊन इतिहासाची पुनरावृत्ती ( Leela Poonawalla Foundation) केली.
डॉ. बेदी म्हणाल्या, “१९९६ मध्ये मला शंका होती की ही संस्था दहा वर्षे टिकेल का. पण जर ती टिकली तर मी पुन्हा येथे येईन, असे मी त्यावेळी म्हटले होते. २००५ मध्ये मी परत आले आणि आज पुन्हा ३० वर्षांनंतर येथे उपस्थित राहून मला अत्यानंद होत आहे. लीला पूनावाला फाउंडेशन एक वट वृक्ष झाला असून हजारो युवतींना बळ देते आहे, जे अभिमानास्पद बाब ( Leela Poonawalla Foundation) आहे. मला खात्री आहे की ही संस्था कायमस्वरूपी चालत राहील.”
या प्रसंगी संस्थापक विश्वस्त फे्रनी तारापोरे, शेर्नाझ एडीबम, माया ठदानी (व्हिडिओ संदेशाद्वारे) आणि फिरोज पुनावाला उपस्थित होते. सर्व विश्वस्तांनी ( Leela Poonawalla Foundation) आपले अनुभव मांडत सोहळ्याला संस्मरणीय स्वरूप दिले.
डॉ. बेदींनी एलपीएफच्या ३० वर्षांच्या कार्यप्रवासावर आधारित स्मरणिका प्रकाशित केली. पुनावालांनी त्यांना विशेष भेट म्हणून एक भिंतीवरील घड्याळ प्रदान केले आणि म्हणाले, “ही घड्याळ सतत चालणाऱ्या आणि वाढणाऱ्या लिला पुनावाला फाउंडेशनचे प्रतीक आहे.”

समारंभाला १९९६ च्या पहिल्या बॅचमधील अनेक विद्यार्थिनींनी उपस्थिती दर्शवली, काहींनी प्रत्यक्ष आणि काहींनी व्हिडिओ संदेशाद्वारे आपली भावना व्यक्त ( Leela Poonawalla Foundation) केली.
डॉ. बेदींनी विद्यार्थिनींना उद्देशून सांगितले, “तीन दशकांपूर्वी मी येथे आले तेव्हा फक्त २० मुली होत्या, आणि आज एलपीएफचे कुटुंब १८,००० पेक्षा अधिक आहे. ही तुमच्या ‘लिला गर्ल्स’ची शक्ती आहे. आता या चळवळीला पुढील अनेक वर्षे चालविण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे.”
सुश्री लिला पुनावाला यांनी आपल्या भाषणात सांगितले, “आमचे ध्येय केवळ शिष्यवृत्तीपुरते मर्यादित नाही. आम्ही आत्मविश्वासी, सक्षम आणि संवेदनशील ( Leela Poonawalla Foundation) महिला नेत्यांचा विकास करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. आमच्यावर विश्वास ठेवून आमच्यासोबत चालणाऱ्या सर्वांचे मी मनापासून आभार मानते.”
एलपीएफने गेल्या तीन दशकांत आपल्या कार्यक्षेत्राचा विस्तार पुण्याबरोबर वर्धा, अमरावती, नागपूर, हैदराबाद आणि बेंगळुरू येथे केला आहे. संस्थेने पदव्युत्तर आणि पदवी शिष्यवृत्तीबरोबरच शालेय मुलींसाठी ‘2morrow 2gether’ हा विशेष कार्यक्रमही सुरू केला आहे.
३० वर्षांच्या या यशस्वी प्रवासानंतर, फाउंडेशनने २०३० पर्यंत २५,००० आर्थिकदृष्ट्या दुर्बल मुलींचे जीवन सकारात्मकपणे बदलण्याचे ध्येय ठेवले आहे — ज्याचा परिणाम केवळ मुलींवरच नव्हे, तर त्यांच्या कुटुंबांवर आणि समाजावरही होणार ( Leela Poonawalla Foundation) आहे.