Team My Pune City – कुरुळी येथे एका पत्र्याच्या खोलीत(Kuruli Crime News) मिलन नाईट मटका जुगार चालवणाऱ्या एका आरोपीसह जुगार खेळणाऱ्या दोन जणांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई गुरुवार ( दि.31 जुलै) रोजी रात्री आठ वाजता डिके चौकाजवळ कुरुळी येथे करण्यात आली.
याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल राजकुमार हनुमंते यांनी फिर्याद दिली आहे. आरोपी हनुमंत विठ्ठल सुर्यवंशी (२१, भोसरी), मारुती शंकर पिटाळे (५२, वराळे) आणि लालासाहेब दशरथ उपाळे (३४, मोशी) यांच्या विरोधात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम १८८७ कलम १२ अ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
PMPML: श्रावण महिन्यात शिवलिंग तीर्थक्षेत्र दर्शनासाठी पीएमपीएमएलची खास ‘पर्यटन बससेवा क्र.12’ सुरु
Ajit Foundation: अजित फाऊंडेशनला CSR अंतर्गत किराणा साहित्याची भरीव
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हनुमंत सूर्यवंशी हा मिलन नाईट मटका जुगार चालवत होता आणि आरोपी मारुती आणि लालासाहेब जुगार खेळत होते. पोलिसांनी त्यांना 2 हजार 700 रुपयांची रोख रक्कम आणि मटक्याचे साहित्यसह ताब्यात घेतले. महाळुंगे एमआयडीसी पोलीस पुढील तपास करत आहेत.