नवकार आर्ट फाऊंडेशन आयोजित चित्र प्रदर्शनाला बालगंधर्व कलादालनात सुरुवात
Team My Pune City –कला जोपासण्यासाठी वयाचे बंधन नाही. उद्योग-व्यवसायात राहून (Krishnakumar Goyal)अनेकांनी कला जोपासली आहे. जीवनाकडे कसे बघावे याचा वस्तुपाठ कलेतून मिळतो, असे प्रतिपादन कोहिनूर ग्रुपचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांनी केले. कलाकारांमधील कलेला प्रोत्साहन दिल्याशिवाय समाजात कलाकारांची संख्या वाढणार नाही, असेही त्यांनी नमूद केले.
नवकार आर्ट फाऊंडेशनतर्फे महाराष्ट्रातील 40 चित्रकारांनी रेखाटलेल्या 90 चित्रांचे प्रदर्शन बालगंधर्व कलादालनात आयोजित करण्यात आले आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन आज (दि. 12) कृष्णकुमार गोयल यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. ज्येष्ठ चित्रकार मुरली लाहोटी, सुरेश लोणकर, सरहद, पुणेचे संस्थापक संजय नहार, आनंद दरबारचे संस्थापक बाळासाहेब धोका, जैन अल्पसंख्याक विकास आणि आर्थिक मंडळाचे संदीप भंडारी, वंचित विकासचे अध्यक्ष विजय मारलेचा, उद्योजिका राजश्री पारख, संयोजक मनसुख छाजेड, प्रेरणा नहार यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रदर्शन 14 ऑक्टोबर पर्यंत सकाळी 10 ते रात्री 8 या वेळात सर्वांसाठी खुले आहे.
Lonikand Crime News : लोणीकंद येथे युवकाकडून २२ लाखांहून अधिक किमतीचा अफू जप्त
Gahunje: गहुंजे येथे पोहायला गेलेल्या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू
प्रेरणा नहार, कीर्ती ओसवाल, संजय संचेती, प्रतिभा दुगड, रोशनी नहार, सतिश दुगड, मनोज नहार, अनुज नहार यांनी संयोजन केले आहे.
महाराष्ट्रातील 60 चित्रकारांच्या 200 चित्रांमधून 90 चित्रांची प्रदर्शनासाठी निवड करण्यात आली आहे. प्रदर्शनात 23 महिला, 7 पुरुष आणि 10 बाल कलाकारांच्या चित्रांचा समावेश आहे. कलाकारांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी प्रदर्शन आयोजित करण्यात आले असल्याचे संयोजक मनसुख छाजेड यांनी प्रास्ताविकात सांगितले. कलाकारांसाठी शैक्षणिक संस्था सुरू करण्याचा विचार असल्याचे ते म्हणाले.
प्रदर्शनातील चित्रांची पाहणी केल्यानंतर कृष्णकुमार गोयल पुढे म्हणाले, कलाकारांनी सुंदर चित्रे रेखाटली आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांचे चित्र बघितले की मनात शौर्याची, देव-देवतांची चित्रे बघितली की भक्तीची, निसर्गाची चित्रे बघितले की सौंदर्याची अनुभूती येते.

दरवर्षी आयोजित करण्यात येत असलेल्या उपक्रमाचे राजश्री पारख यांनी कौतुक केले.
मुरली लाहोटी म्हणाले, चित्रकाराचे चित्र बोलते, लेखकाचा लेख बोलतो तर कवीची कविता बोलते. यातूनच पुढे इतिहास घडतो. सुरेश लोणकर यांनी चित्रकारांच्या कलेचे कौतुक केले.
कला समाजाला जोडण्याचे काम करते असे सांगून संजय नहार म्हणाले, नवकाराचा उच्चार केला की मांगल्याचे विचार मनात येतात. मांगल्याच्या भावनेतून सुरू असलेले उपक्रम अभिनंदनीय आहेत. बाळासाहेब धोका, राजेंद्र मेहता, संदीप भंडारी, विजय मारलेचा यांनी मनोगत व्यक्त केले.
मान्यवरांचा सत्कार मनसुख छाजेड, पलक देसरडा, मनोज पवार, रोशनी नहार, कीर्ती ओसवाल, अमिता देसाई, अर्चना शहा, सतीश दुगड यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतिभा दुगड यांनी केले तर आभार अनुज नहार यांनी मानले.