situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Kothrud: कोथरूडमध्ये मुलाकडून पित्याचा खून

Published On:

Team My Pune City – कोथरूड येथील (Kothrud)जयभवानीनगरात क्षुल्लक कारणावरून मुलाने वडिलांवर चाकूने वार करत त्यांचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी मुलाला अटक केली आहे.

मृत व्यक्तीचे नाव तानाजी पायगुडे (वय 72, रा. जयभवानीनगर, पौड रोड, कोथरूड) असे असून, आरोपी मुलाचे नाव सचिन तानाजी पायगुडे (वय 33) असे आहे. या खुनाबाबत तानाजींची पत्नी सुमन पायगुडे (वय 68) यांनी फिर्याद दिली असून, कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पायगुडे कुटुंब जयभवानीनगर येथील एका चाळीत राहते. गुरुवारी (दि. 2 ऑक्टोबर) दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. घरातील सदस्य दसऱ्याची तयारी करत असताना तानाजी यांच्या डोळ्यात औषध टाकण्याची वेळ होती. त्यावेळी सचिन टीव्ही पाहत होता. त्याला टीव्ही बंद करण्यास सांगितले असता वडील-मुलामध्ये वाद झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि संतापलेल्या सचिनने घरातील चाकू उचलून वडिलांच्या गळ्यावर व चेहऱ्यावर वार केले.

तानाजी यांच्या किंकाळ्यांवर धावून आलेल्या पत्नी सुमन यांनी त्यांना गंभीर अवस्थेत पाहिले. तातडीने त्यांना रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

Eknath Shinde Dasara Melava : पूरग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत मिळेल -एकनाथ शिंदे

Vijaya Dashmi : श्रीमंत सरसेनापती दाभाडे राजघराण्याच्या शस्त्रपूजनाचा पारंपरिक सोहळा उत्साहात

घटनेची माहिती मिळताच पोलिस उपआयुक्त (झोन 3) संभाजी कदम, सहाय्यक पोलिस आयुक्त भाऊसाहेब पाटरे व वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीप देशमाने यांनी घटनास्थळी भेट दिली. आरोपी सचिन घटनास्थळावरून पसार झाला होता; मात्र पोलिसांनी शोध घेऊन त्याला अटक केली. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

ही घटना परिसरात मोठ्या प्रमाणावर खळबळ उडवणारी ठरली असून, वडिलांचा जीव घेणाऱ्या मुलाच्या कृत्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

Follow Us On